Advertisement

ओमिक्रॉनच्या नव्या व्हेरिएंटची भारतात एंट्री, 'या' 4 राज्यांत सापडले 71 रुग्ण

ओमिक्रॉनच्या नवीन XBB सबव्हेरियंटने आता भारतात शिरकाव केला आहे.

ओमिक्रॉनच्या नव्या  व्हेरिएंटची भारतात एंट्री, 'या' 4 राज्यांत सापडले 71 रुग्ण
SHARES

ओमिक्रॉनच्या नवीन XBB सबव्हेरियंटने आता भारतात शिरकाव केला आहे. वेगवेगळ्या राज्यांमध्ये या ल्हेरिएंटच्या 71 प्रकरणांची नोंद केली आहे.

महाराष्ट्राने गुरुवारी पहिल्या पाच संसर्गाची नोंद केली आहे ज्यात पश्चिम बंगाल, ओडिशा आणि तामिळनाडूचा समावेश आहे. एका पंधरवड्याच्या कालावधीत, ओडिशात 33, बंगालमध्ये 17 आणि तामिळनाडूमध्ये 16 प्रकरणे नोंदवली गेली.

XBB हे Omicron च्या BA.2.75 आणि BJ.1 प्रकारांच्या संयोजनाने बनलेले आहे. सिंगापूर आणि यूएसमध्ये ऑगस्टमध्ये हे पहिल्यांदा आढळून आले. शास्त्रज्ञांचा असा विश्वास आहे की XBB सब व्हेरिएंटने रोग प्रतिकारशक्तीवर मात करण्यास सक्षम आहे.

कोरोना संसर्ग झालेल्यांना रुग्णालयात दाखल करणे आवश्यक आहे. हा व्हायरस नेमका किती गंभीर आहे याबाबत माहिती समोर आलेली नाही. टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, सिंगापूरमध्ये कोरोना संसर्गाच्या प्रकरणांमध्ये वाढ झाली आहे. तिथल्या आरोग्य मंत्रालयाने सांगितले की आतापर्यंत XBB उप-प्रकारचे परिणाम गंभीर असल्याचे कोणतेही पुरावे मिळालेले नाहीत.

सिंगापूरमध्ये, XBB सध्या इतर सर्व Omicron सब व्हेरिएंटवर वर्चस्व गाजवते. XBB जगाच्या अनेक भागांमध्ये आढळले आहे, परंतु सिंगापूरमध्ये ते खूप वेगाने वाढत आहे.

11 ऑक्टोबर रोजी सिंगापूरमध्ये कोरोनाव्हायरस संसर्गाची 11,732 नवीन प्रकरणे नोंदवली गेली. यामध्ये मोठ्या प्रमाणावर XBB व्हेरिएंटचा संसर्ग झालेल्यांचा समावेश आहे. सिंगापूरच्या एमओएचने सांगितले की गेल्या आठवड्यात संसर्गामध्ये 22 टक्के वाढ झाली आहे. सुमारे 55 टक्के नवीन संक्रमण XBB स्ट्रेनचे आहेत. याला BA.2.10 असेही म्हणतात.



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा