पुणे (pune) शहरात झिका रुग्णांची (zika patients) संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आता रुग्णांची संख्या 52 वर पोहोचली आहे. आतापर्यंत झिकाची लागण (zika virus) झालेल्या चार रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाची समिती या मृत्यूंची पाहणी करणार आहे. त्यातून त्याच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल.
शहरात झिकाचे सर्वाधिक 11 रुग्ण पुण्यातील एरंडवणे क्षेत्रीय कार्यालयाच्या परिसरात आढळून आले आहेत. त्याखालोखाल डहाणूकर कॉलनी क्षेत्रीय कार्यालय परिसरात 10 रुग्ण आढळले आहेत, खराडी 6, पाषाण 5, मुंढवा, सुखसागर नगर प्रत्येकी 4, आंबेगाव बुद्रुक, घोले रोड प्रत्येकी 3, कळस 2, धनकवडी, लोहगाव, ढोले-पाटील रोड, वानवडी प्रत्येकी 1 अशी आढळलेल्या रुग्णांची संख्या आहे.
गुरुवारी शहरात कोथरूडमधील गुजरात कॉलनी, खराडीतील शिवाजी चौक, सेनापती बापट रोडवरील मंगलवाडी येथे तीन नवीन रुग्ण आढळून आले.
कोथरूड येथील गुजरात कॉलनीतील एका 68 वर्षीय रुग्णाचा मृत्यू झाला आहे. त्याचा झिका चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. अवयव निकामी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. बाणेर येथील अथश्री सोसायटीतील 78 वर्षीय रुग्णाचा मृत्यू झाला आहे. त्यांचा मृत्यू हृदयविकाराने झाल्याचे प्रथमदर्शनी समोर आले आहे.
एरंडवणे (Erandwane) येथील 76 वर्षीय रुग्ण आणि खराडी येथील 72 वर्षीय रुग्ण या दोन रुग्णांचा मृत्यू झाला. हे रुग्ण आजारी असल्याने त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार केले जात होते. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचा झिका चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला असे महापालिकेचे सहायक आरोग्य अधिकारी डॉ. सूर्यकांत देवकर यांनी सांगितले.
हेही वाचा