गेल्या वर्षी BG खेर मार्ग (पूर्वी रिज रोड म्हणून ओळखला जाणारा) मलबार हिल इथं भूस्खलनात नुकसान झालं होतं आणि तेव्हापासून हा मार्ग बंद आहे. आता पुढील वर्षी पावसाळ्यानंतरच त्यावर काम सुरू होईल, असं अहवालात म्हटलं आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे की, ते खाली पाण्याच्या पाइपलाइन टाकत आहेत. पाण्याच्या पाइपलाइनचं काम झाल्यानंतरच कामाला सुरुवात होईल. काम सुरू करण्यापूर्वी प्रशासकिय संस्था पुढील वर्षीच्या पावसाळ्याची वाट पाहत आहेत.
ऑगस्ट २०२० मध्ये, भूस्खलन झालनंतर रस्ता बंद झाला. यामुळे आजूबाजूला पाणीपुरवठा करणाऱ्या पाण्याच्या पाइपलाइनचं मोठं नुकसान झालं होतं. मात्र, तात्पुरती व्यवस्था करून पाणीपुरवठा तातडीनं पूर्ववत करण्यात आला. मात्र रिज रोडचे काम सुरू करण्यापूर्वी पालिकेला या पाइपलाइन कायमस्वरूपी दुरुस्त कराव्या लागणार आहेत.
कंत्राटदार नेमण्यासाठी निविदा काढण्याचं काम जवळपास पूर्ण झाल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं. हायड्रोलिक अभियांत्रिकी विभागाचं पाईपलाईनचं काम पूर्ण झाल्यावरच पुढचं कामं सुरू होईल. तरी पाईपलाईनचे काम पूर्ण होण्यास ३ ते ४ महिने जातील.
हा रस्ता महत्त्वाचा आहे कारण तो मलबार हिल परिसराला ह्युजेस रोड, नेपेंसी रोड आणि पेडर रोडच्या प्रमुख जंक्शन्सशी जोडतो.
दरम्यान, यावर्षी १७-१८ जुलैच्या मध्यरात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे सुमारे चार महिने बंद राहिल्यानंतर ओशिवरा पूल आता वाहनांच्या वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे.
हेही वाचा