Advertisement

सर्व स्थानकांवर ५० सॅनिटरी नॅपकिन वेंडिंग मशिन्सची व्यवस्था

मध्ये रेल्वेच्या स्थानकात महिलांना चांगल्या सुविधा देण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात आला आहे.

सर्व स्थानकांवर ५० सॅनिटरी नॅपकिन वेंडिंग मशिन्सची व्यवस्था
SHARES

मध्य रेल्वेच्या मुंबई विभागानं स्थानकांवर आणि वेटिंग हॉलमधील महिलांच्या स्वच्छतागृहांमध्ये ५० सॅनिटरी पॅड वेंडिंग मशिन बसवल्या आहेत. स्थानकात महिलांना चांगल्या सुविधा देण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात आला आहे.

सीएसएमटी स्थानकामध्ये पहिलं सॅनिटरी पॅड वेंडिंग मशीन बसवण्यात आलं आहे. या मशिनमधून अवघ्या ५ रुपयांत सॅनिटरी पॅड उपलब्ध होईल, असं मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं.

यापूर्वी, पश्चिम रेल्वेनं (WR) चर्चगेट इथल्या मुख्यालयासह सहा विभागांमध्ये आपल्या महिला कर्मचाऱ्यांसाठी सॅनिटरी पॅड व्हेंडिंग मशीन बसवल्या होत्या. तिथं काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांची या मशिनमुळे मोठी सोय झाली.

चर्चगेट व्यतिरिक्त, वडोदरा, अहमदाबाद, रतलाम, राजकोट आणि भावनगर या इतर पाच विभागांमध्ये सॅनिटरी पॅड व्हेंडिंग मशिन बसवण्यात आली होती. तिथे काम करणाऱ्या सर्वात ज्येष्ठ किंवा सर्वात तरुण महिला कर्मचाऱ्यांच्या हस्ते त्यांचं उद्घाटन करण्यात आलं.

याशिवाय, मासिक पाळीच्या काळात महिलांना चांगल्या सुविधा देण्यासाठी महाराष्ट्रातील नऊ कारागृहांनी त्यांच्या आवारात सॅनिटरी पॅड डिस्पेन्सर आणि डिस्पेन्सर मशीन बसवले आहेत.



हेही वाचा

ट्रेनचे वेळापत्रक, लाईव्ह स्टेटस एका क्लिकवर, जाणून घ्या कसे?

एसटी कर्मचाऱ्यांना नवीन वेतनवाढ लागू

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा