Advertisement

अटल सेतू पुलाला तडे, कंत्राटदाराला 1 कोटीचा दंड

भारतातील सर्वात लांब सागरी सेतू- अटल सेतूच्या अप्रोच रोडला दोन महिन्यांनी तडे गेल्यानंतर मुंबई महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणानेस्ट्रबाग या कंत्राटदाराला एक कोटी रुपयांचा दंड ठोठावला असल्याचे समोर आले आहे.

अटल सेतू  पुलाला तडे, कंत्राटदाराला 1 कोटीचा दंड
SHARES

भारतातील सर्वात लांब सागरी सेतू- अटल सेतूच्या अप्रोच रोडला दोन महिन्यांतच तडे गेले. याप्रकरणी मुंबई महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणाने (mmrda) स्ट्रबाग या कंत्राटदाराला एक कोटी रुपयांचा दंड (fine) ठोठावला आहे.

नवी मुंबईतील (navi mumbai)उलवे ते दक्षिण मुंबईला (mumbai) जोडणाऱ्या महत्त्वाकांक्षी पुलाचे उद्घाटन जानेवारी 2024 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले.

माहिती अधिकार (RTI) कार्यकर्ते अनिल गंगाली म्हणाले, “एमएमआरडीएने सांगितले की, अटल सेतूच्या रोडवर खड्डे पडल्याच्या बाबतीत तपासणीदरम्यान पुलाच्या रॅम्प 5 ला जोडणाऱ्या रस्त्यावर काही लहान खड्डे (potholes)आढळून आले. 

हा मुख्य पुलाचा भाग नसला तरी जून 2024 च्या तिसऱ्या आठवड्यात खड्डे तातडीने दुरुस्त करण्यात आले. या संदर्भात स्ट्रॅबग या कंत्राटदाराला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे,” असे प्राधिकरणाने सांगितले.

गलगली यांना मिळालेल्या कागदपत्रांनुसार, “22 जून 2024 रोजी एमएमआरडीएचे मुख्य अभियंता डी.एम. चामलवार यांनी स्ट्राबग या ठेकेदाराला नोटीस बजावून सांगितले की, रस्त्याचे काम 5 जानेवारी 2024 रोजी पूर्ण झाले तरीही कामाचा दर्जा योग्य नाही. 

“यानंतर, अटल सेतूचे सल्लागार केआर शिवानंद यांनी ही नोटीस मिळाल्यानंतर 48 तासांच्या आत वरील समस्या दुरुस्त करण्यासाठी स्ट्राबग या कंत्राटदाराला 1कोटी रुपयांची नोटीस पाठवली. याशिवाय, या दोषांचे निराकरण करण्यासाठी आणि फुटपाथची गुणवत्ता आवश्यक मानकांपर्यंत आणण्यासाठी तुम्ही काय उपाययोजना कराल याची रूपरेषा देणारा तपशीलवार कृती आराखडा प्रदान करा,” असे नोटीसमध्ये म्हटले आहे.

एमएमआरडीएने जूनमध्ये अधिकृत निवेदनात स्पष्ट केले की, उलवे येथील अटल सेतूला जोडणाऱ्या अप्रोच रोडवर किरकोळ खड्डे आढळून आले आहेत, जो पुलाचा भाग नसून पुलाला जोडणारा सर्व्हिस रोड आहे. गेलेले तडे प्रकल्पातील संरचनात्मक दोषांमुळे नाहीत आणि पुलाच्या संरचनेला कोणताही धोका नाही, असेही त्यात नमूद केले आहे.



हेही वाचा

अंधेरी सबवेत पाणी साचण्याची समस्या BMC कशी सोडवेल?

सांताक्रूझ : डंपरच्या धडकेत 59 वर्षीय महिलेचा मृत्यू

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा