स्थानिक राजकारणी आणि नागरिकांच्या विरोधामुळे बृहन्मुंबई महानगरपालिकेनं (BMC) मालाड स्कायवॉकचे काम सध्या थांबवले आहे. पालिकेच्या प्रकल्पानुसार स्कायवॉक मालाड मेट्रो स्टेशनला मालाड रेल्वे स्टेशनशी जोडणार आहे. स्कायवॉकची योजना करण्याचे आणखी एक कारण म्हणजे गर्दी कमी होण्यास मदत होईल आणि मेट्रो आणि रेल्वेतून प्रवास करणाऱ्यांसाठी आणखी सुरळीत होईल.
या प्रकल्पासाठी सुमारे ३६ कोटी रुपये इतका खर्च येणार आहे. नागरी संस्थेनं म्हटलं आहे की, स्थानिकांच्या विरोधामुळे हा प्रकल्प आता विलंबित झाला आहे. कारण स्थानिकांना वाटतं की यामुळे त्यांच्या खाजगी आयुष्यावर परिणाम होईल. ही पहिलीच वेळ आहे जेव्हा प्रशासकिय संस्था स्वतः स्कायवॉक बांधत आहे.
अलीकडेच, पालिकेनं वांद्रे पूर्व स्कायवॉकच्या पुनर्बांधणीची योजना आखली होती. सांताक्रूझ पूर्वेकडील स्कायवॉकच्या विस्तारासाठीही त्यांनी नियोजन केलं होतं. तथापि, त्या दोघांचे बांधकाम इतर सरकारी संस्थांनी केलं.
स्थानिकांनी तक्रार केली आहे की स्कायवॉक त्यांच्या इमारतींच्या जवळ असेल. ज्यामुळे त्यांची गोपनियता भंग होईल.
प्रशासकिय अधिकार्यांनी परिस्थितीकडे लक्ष वेधताना सांगितलं की, बांधकाम सुरू झाल्यानंतर लगेचच स्थानिकांनी विरोध केला. स्थानिकांच्या विरोधामुळे हे काम जवळपास दोन महिने उशिरानं होत आहे. अधिकाऱ्यानं सांगितलं की ते या समस्येचं निराकरण करण्याचा प्रयत्न करीत आहेत जेणेकरून काम लवकर सुरू होईल.
हेही वाचा