केंद्र सरकारच्या हाऊस फॉर ऑल या धोरणानुसार सिडको चालू वर्षात तब्बल ८८ हजार ९६१ घरं बांधणार आहे. यातील पहिल्या टप्प्यात चाळीस हजार घरं बांधली जाणार आहेत. या सर्व घरांसाठी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सिडको ४० योजना जाहीर करणार आहे.
सिडकोने मागील तीन वर्षांत पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत २४ हजार घरांची योजना जाहीर केली. संगणकीय सोडतीत यशस्वी ठरलेल्या ग्राहकांना कागदोपत्री संपूर्ण प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर ताबापत्रेही वाटप करण्यात आली आहेत. परंतु कोरोना आणि इतर तांत्रिक अडचणींमुळे पात्रताधारकांना अद्यापी प्रत्यक्ष घरांचा ताबा मिळालेला नाही.
या पार्श्वभूमीवर सिडका आणखी ४० हजार घरांच्या योजनेची घोषणा करणार आहे. नवी मुंबई, पनवेल आणि उरण परिसरात ही घरं बांधली जाणार आहेत. आर्थिकदृष्ट्या दुर्बल व अल्प उत्पन्न गटातील घरांचा यात समावेश आहे. यातील ३५ टक्के घरं पंतप्रधान आवास योजनेसाठी असणार आहेत.