Advertisement

2025 मध्ये वडाळा-घाटकोपर-ठाणे धावणार मेट्रो

मेट्रो 4 या प्रकल्पांमुळे ठाणेकरांची वाहतुक कोंडीतून सुटका होणार आहे.

2025 मध्ये वडाळा-घाटकोपर-ठाणे धावणार मेट्रो
SHARES

वडाळा-घाटकोपर-कासारवडवली या मेट्रो चार मार्गिचे काम पुढील वर्षी म्हणजेच 2025 पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. 

मेट्रो 4 या प्रकल्पांची खासदार राजन विचारे यांनी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (MMRDA) विभागातील अधिकाऱ्यांसोबत पाहणी केली. त्यावेळी अधिकाऱ्यांनी हा प्रकल्प 65.32 टक्के पूर्ण झाला असून डिसेंबर 2025 पर्यंत पूर्ण होणार असल्याची माहिती दिली. हा पूर्ण झाल्यानंतर ठाणेकरांचा प्रवास सुसाट आणि सुलभ होईल.

तसेच घोडबंदरच्या कोंडीतून नागरिकांची सुटका होण्याची शक्यता आहे. तसेच मध्य रेल्वेच्या वाहतुकीवर होणारा ताण देखील कमी होऊ शकतो. 

मार्गावरील मेट्रो स्थानके - भक्ती पार्क मेट्रो, वडाळा टीटी, अनिक नगर बस डेपो, सिद्धार्थ कॉलनी.

कामाची स्थिती - 46.53%

गरोडिया नगर ते सूर्या नगर : या मार्गावरील मेट्रो स्थानके - गरोडिया नगर, पंतनगर, लक्ष्मी नगर, श्रेयस सिनेमा, गोदरेज कंपनी, विक्रोळी मेट्रो, सूर्यनगर.

कामाची स्थिती – 87.81%

गांधीनगर ते सोनापूर : या मार्गावरील मेट्रो स्थानके - गांधीनगर, नेव्हल हाऊसिंग, भांडुप महानगरपालिका, भांडुप मेट्रो, शांग्रीला, सोनापूर.

कामाची स्थिती - 54%

मुलुंड ते माजीवडा : या मार्गावरील मेट्रो स्थानके - मुलुंड फायर स्टेशन, मुलुंड नाका स्टेशन, तीन हात नाका, आरटीओ ठाणे, महापालिका मार्ग, कॅडबरी जंक्शन, माजिवडा.

कामाची स्थिती – 90.98%

कापूरबावडी ते कासारवडवली : या मार्गावरील मेट्रो ठिकाणे - कापूरबावडी, मानपाडा, टिकुजिनी वाडी, डोंगरी पाडा, विजय गार्डन, कासारवडवली.

कामाची स्थिती – 55.38%

मेट्रो मार्ग क्रमांक 4A कासारवडवली ते गायमुख- या मार्गावर असणारी मेट्रो स्थानके- गोवनी पाडा ,गायमुख

कामाची स्थिती – 67.31%

यासाठी महापालिकेने 10 हजार 412.61 कोटी इतक्या रकमेचा डीपीआर तयार असून तो आपल्या गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्रालय भारत सरकार यांच्याकडे सादर करण्यात आलेला आहे. या प्रकल्पासाठी राज्य शासनाने मंजुरी दिलेली आहे. परंतु अद्याप केंद्र शासनाने मंजुरी न दिल्याने अंतर्गत मेट्रो प्रकल्प रखडला आहे.



हेही वाचा

रे रोड ब्रिज मे 2024 पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता

लवकरच मुंबई-नागपूर दरम्यानचा प्रवास 8 तासात पूर्ण होणार

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा