जीटीबीनगर - हार्बर मार्गावरील गुरू तेग बहादूरनगर स्थानक इथे चार दिवस झाले तरी रेल्वे रुळ सुरळीत करण्याचे काम रेल्वे कर्मचारी करताना दिसत आहेत. मात्र रेल्वे रुळालगत असलेल्या सांडपाण्याचा प्रवाह अजूनही रेल्वे रुळामध्ये वाहत आहे.
या ठिकाणी फलाट क्रमांक एकवर नाल्याच्या सांडपाण्यामुळे मालगाडीचे चार डबे घसरले होते. सोमवारी 27 फेब्रुवारी 2017 रोजी घडलेल्या या घटनेची चर्चा असताना पुन्हा या ढासळलेल्या नाल्याच्या कठड्यावर मालगाडीचे घसरलेले चारही डबे ठेवण्यात आलेत. त्यामुळे पुन्हा अशी घटना घडण्याची शक्यता प्रवाशांकडून व्यक्त होत आहे.रेल्वे रुळालगतच्या सांडपाण्यामुळे हा अपघात झाला आहे असे जरी प्रवासी म्हणत असतील तरी सांडपाण्यामुळे अपघात झाला आहे असे स्पष्टीकरण देऊ श
कत नाही, मात्र सदरील घटनेबाबत चौकशी करण्यासाठी एक कमिटी तयार करण्यात येणार असून ते अभ्यास करून झालेल्या दुर्घटनेचे कारण स्पष्ट करतील असे वडाळा लोहमार्ग वरिष्ठ पोलीस निरीक्षक आय. बी. सरोदे यांनी सांगितले.