Advertisement

वर्सोवावरून समुद्रामार्गे पालघर गाठता येणार, प्रवाशांचा वेळ वाचणार

वर्सोवा ते विरार प्रस्तावित सागरी सेतू मार्ग (सी लिंक) आता पालघरपर्यंत वाढवण्यात येणार आहे.

वर्सोवावरून समुद्रामार्गे पालघर गाठता येणार, प्रवाशांचा वेळ वाचणार
SHARES

वर्सोवा ते विरार प्रस्तावित सागरी सेतू मार्ग (सी लिंक) आता पालघरपर्यंत वाढवण्यात येणार आहे. मुंबई महानगर क्षेत्रविकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) तशा हालचाली सुरू केल्या आहेत.

मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर एमएमआरडीएने तशा निर्णय घेतला असून लवकरच यासंबंधी अहवाल तयार करण्याचे काम सुरू करण्यात येणार आहे.

वर्सोवा-विरार सागरी सेतूचे कामयापूर्वी राज्य रस्ते विकास महामंडळाकडे (एमएसआरडीसी)कडे होते. मात्र आता हा प्रकल्प एमएमआरडीएकडे हस्तांतरित केला आहे. एमएमआरडीए या वर्षाअखेर मुंबईतील तिसऱ्या सीलिंकचे काम सुरू करण्याच्या प्रयत्नात आहे.

प्रस्तावित सागरी सेतू प्रकल्पाच्या खर्चात तब्बल आठ हजार कोटींनी वाढ झाली आहे. या प्रकल्पाचा पहिलेचा खर्च जवळपास ३२ हजार कोटी इतका होता. आता हा खर्च जवळपास ४० हजार कोटी इतका झाला आहे. एमएमआरडीए पुलाचे काम सुरू करण्याआधी एमएसआरडीसीने तयार केलेल्या अहवाल तपासणार आहे. मूळ अहवालाचा नवा तपासणी अहवाल तयार होणार आहे. त्यासाठी ‘एमएमआरडीए’ने निविदा काढली असून, त्याद्वारे सल्लागार नेमला जाणार आहे.

वर्सोवा ते पालघरपर्यंत बनवणारा हा मुंबईतील तिसरा सी लिंक असणार आहे. वांद्रे ते वरळीदरम्यान ५.६ किलीमीटर लांबीचा एक सीलिंक २०१०मध्ये तयार करण्यात आला होता. या पुलावरुन रोज हजारो वाहनांचा प्रवास होतो.

तर, वांद्रे ते वर्सोवापर्यंत १७ किलोमीटर लांबीच्या सीलिंकचे काम प्रगतीपथावर आहे. ८ लेन असलेल्या यापुलासाठी ११ हजार ३३२ कोटींचा खर्च येणार आहे. हे तिन्ही सी लिंक एकमेकांना जोडण्याची सरकारची योजना आहे.

'असा' असेल सी लिंक

वर्सोवा-पालघर हा मार्ग एकूण ४२.७५ किलोमीटरचा असेल. या मार्गिकेवर चारकोप, मिरा- भाईंदर, वसई, विरार असे चार कनेक्ट असतील. या चारही ठिकाणांहून सागरी सेतू जोडला जाणार आहे. सागरी किनाऱ्यापासून एक किलोमीटरवर हा मार्ग असेल. अंधेरी पश्चिम ते विरारला ही मार्गिका संलग्न असेल. गोराई, उत्तन, वसई व विरार येथे चार टोल प्लाझा असतील. तसेच या मार्गिकेपासून वसईपर्यंत १८.४६ किमीचा विशेष रस्ताही प्रस्तावित आहे.



हेही वाचा

मुंबई विमानतळ ते नवी मुंबई विमानतळ अंतर केवळ ३० मिनिटांत पार होणार

पाम बीच रोड ऐरोली-मुलुंड पुलापर्यंत वाढवणार

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा