Advertisement

हिवाळा आला, ऊबदार कपडे खरेदी करताय ना?


हिवाळा आला, ऊबदार कपडे खरेदी करताय ना?
SHARES

सध्या थंडीचा मोसम सुरू असल्याने उबदार कपड्यांच्या खरेदीसाठी मुंबईकरांची पावले दादरच्या बाजरपेठेकडे वळली आहेत. इथे वेगवेगळे रंग, डिझाईन आणि विविध किंमतींमध्ये उबदार कपडे विक्रीसाठी ठेवण्यात आले आहेत.


सर्वांसाठीच कपडे!

यामध्ये प्रामुख्याने ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वेटर, स्लीव्हलेस स्वेटर, मफलर, कानटोपी, कानपट्टी यांचा समावेश आहे. तरुणांसाठी जॅकेट, झिपर, प्रिंटेड मंकीकॅप, हँडग्लोव्हज तसेच थंडीपासून संरक्षण करणारे उबदार स्टायलिश कपडे उपलब्ध आहेत. यात तरुणीही मागे नाहीत. त्या लाईट रंगाच्या झुबकेदार केसाळ लांब स्वेटरना अधिक पसंती देताना दिसत आहेत.


IMG_20171122_115138.jpg


लहान मुलांसाठी स्पेशल काय?

थंडीच्या दिवसात लहान मुलांसाठी कपडे निवडताना विशेष लक्ष दिले जाते. संपूर्ण अंग झाकलेले उबदार कपडे ग्राहक खरेदी करताना दिसत आहेत. यामध्ये विशेषत: लहान मुलांसाठी कार्टूनचे चित्र असलेल्या कानटोपीची चलती आहे. थंडीच्या दिवसांत पायांना ऊब मिळावी म्हणून मोजेही खरेदी केले जात आहेत.


ऑनलाईन शॉपिंगही करू शकता

सध्या ग्राहकांना जाहिरातींच्या माध्यमातून कोणते कपडे खरेदी करावेत? याचे मार्गदर्शन मिळत आहे. त्यामुळे ग्राहक थेट दुकानात गेले की, त्याच कपड्यांची मागणी करत आहेत. काही ग्राहक आपल्याला शोभून दिसतील असेच उबदार कपडे खरेदी करताना दिसत आहेत. सध्या ऑनलाईन शॉपिंग वेबसाईटनेही आपल्या वेबसाईटवर ग्राहकांना स्वेटर उपलब्ध करून दिले आहेत. शॉपिंग वेबसाईटनं पुरुष, स्त्रिया आणि लहान मुलांसाठी ऑनलाईन स्वेटर विक्रीसाठी उपलब्ध करून दिले आहे.


दर अगदी स्वस्त!

स्वेटरचा रंग आणि डिझाईनप्रमाणेच किंमती देखील कमी असल्यामुळे मुंबईकर थंडीपासून बचावासाठी मोठ्या प्रमाणात खरेदी करत असल्याचे चित्र दादरमध्ये आहे. 300 रुपयांपासून 1100 रुपयांपर्यंत वेगवेगळ्या किंमतींमध्ये कपडे विक्रीसाठी ठेवण्यात आले आहेत.


संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा