भुलेश्वर - नवरात्रोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे खरेदीसाठी बाजारात ग्राहकांची लगबग सुरू आहे. यंदा बाजारात मॉर्डन कोटी आणि जॅकेट्ससह रंगीबेरंगी आकर्षक घटही पाहायला मिळत आहेत. बाजारपेठेत या घटांची स्पर्धा सुरू असून ग्राहकांची मोठी मागणी आहे.