कुर्ला - कुर्ल्यात 31 वर्षानंतर शिवसृष्टी फेस्टिव्हलचं आयोजन करण्यात आलं आहे. 2 डिसेंबर ते 13 डिसेंबरपर्यंत हा फेस्टिव्हल असणार आहे. शिवसृष्टी कल्चर आणि स्पोर्ट नावाच्या संस्थेच्या वतीनं फेस्टिव्हलचं आयोजन करण्यात आलं आहे. खासदार पूनम महाजन यांच्या हस्ते फेस्टिव्हलचं उद्घाटन करण्यात आलं. या वेळी शिवसेनेचे आमदार मंगेश कुंडालकर ही उपस्थित होते.