Advertisement

पेट्सचा वाढदिवस साजरा करायचाय? मग आहे ना 'पपकेक फॅक्टरी'


पेट्सचा वाढदिवस साजरा करायचाय? मग आहे ना 'पपकेक फॅक्टरी'
SHARES

आपल्या मुलांचा वाढदिवस आपल्यासाठी खूप महत्त्वाचा असतो. त्याचा पहिला वाढदिवस असो की दहावा पण तो धुमधडाक्यात साजरा केला जातो. तसंच काहीसं पाळीव प्राण्यांच्या बाबतीत झाल्याचं पहायला मिळतं. आता तर काय पाळीव प्राण्यांचा वाढदिवस साजरा करणं, त्यासाठी जंगी पार्टी देणं ही संकल्पना हल्ली जास्त रूजू लागली आहे.



कुत्रा हा आता प्रत्येकाच्या कुटुंबाचा एक अविभाज्य भाग झाला आहे. घरातल्या व्यक्तीवर आपला खूप जीव असतो. तसंच कुत्र्याशीदेखील एक जिव्हाळ्याचं नातं जुळतं. याच प्रेमापोटी हल्ली कुत्र्याचा वाढदिवसही साजरा केला जातो. वाढदिवस साजरा करायचा म्हणजे केक तर पाहिजेच. त्यासाठी देखील आम्ही तुम्हाला एक भन्नाट पर्याय देतो. 'पपकेक फॅक्टरी' तुमच्या पेट्ससाठी खास हेल्दी केक आणि मिल्स बनवून देतील.


कुत्र्यांसाठी स्पेशल ट्रिट

इंटिरियर डिझायनर आणि आर्ट डायरेक्टर गायश्री मारव्हा या तरूणीची ही संकल्पना आहे. पेट्स आणि बेकिंग हे या दोन गोष्टींमध्ये गायश्रीला रुची आहे. या दोन वेगवेगळ्या गोष्टींना एकत्र आणत तिनं एक नवी संकल्पना आणली. गेल्यावर्षी नोव्हेंबरमध्ये पपकेक फॅक्टरीची सुरुवात झाली. पपकेक फॅक्टरीच्या माध्यमातून ती पेट्ससाठी स्वादिष्ट आणि आरोग्यदायी पदार्थ तयार करते. विशेष म्हणजे यातून येणारा पैसा रस्त्यावर राहणाऱ्या कुत्र्यांसाठी वापरण्यात येतो. याच पैशातून रस्त्यावरील कुत्र्यांच्या खाण्याची सोय केली जाते.



पेट फ्रेंडली केक्स

पपकेक फॅक्टरीत बनवण्यात येणारे केक्स आणि मिल्स पेप फ्रेंडली असतात. इथल्या केक्समध्ये साखर, मीठ आणि कुठल्याच प्रकारचे रंग टाकले जात नाहीत. यामध्ये ताजे चिकन, भाज्या आणि फळांचा वापर केला जातो. फक्त एवढंच नाही तर ओट्स केक, ग्लुटन फ्री बिस्कीट्स देखील बनवले जातात. वाढदिवसाव्यतिरिक्त ते कुत्र्यासाठी जेवणही बनवतात.



तुमच्या कुत्र्याचा वाढदिवस जवळ आहे? मग तुमच्यासाठी पपकेक फॅक्टरी आहे ना. ती तुमच्या कुत्र्यासाठी एक स्वादिष्ट आणि हेल्दी केक बनवेल. मग आता तुम्ही तुमच्या कुत्र्याला स्पेशल ट्रीट देणार की नाही?


पपकेक फॅक्टरी

इमेल आयडी - bake@pupcakefactory.com
वेबसाईट - http://www.pupcakefactory.com/
संपर्क - 961 70 636913


हेही वाचा

आता कुत्रा हरवण्याचं टेन्शन नाही!

मॅड अबाऊट डॉग्स? मग तुमच्यासाठी आहेत हे 'मॅड सेंटर्स'!




संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा