प्रभादेवी - राज्य शासनाच्या वतीनं संत साहित्य आणि मानवतावादी कार्यासाठी ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार दिला जातो. 2015-16 या वर्षातला हा पुरस्कार संशोधक-समीक्षक डॉ. उषा माधव देशमुख यांना गुरुवार, 17 नोव्हेंबरला प्रदान होणार आहे.
संत साहित्यावर उत्कृष्ट साहित्य लिहिणाऱ्या किंवा संतांना अभिप्रेत असलेलं मानवतावादी कार्य करणाऱ्या व्यक्तीला राज्य शासनाच्या वतीनं दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो. रुपये 5 लाख रोख, मानपत्र तसंच मानचिन्ह असं या पुरस्कारांचं स्वरूप आहे. आषाढी एकादशीच्या मुहूर्तावर सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी या पुरस्काराची घोषणा केली होती. हा पुरस्कार प्रदान करण्याचा सोहळा प्रभादेवीच्या रवींद्र नाट्य मंदिरात संध्याकाळी 6.30 वाजता होणार आहे.