(EVM machine) मतदान आणि मतमोजणीच्या प्रक्रियेवर सर्व स्थरातून आरोप होत आहेत. 31 जिल्ह्यांतील 95 विधानसभा मतदारसंघात तब्बल 104 उमेदवारांनी ईव्हीएम (EVM) आणि व्हीव्हीपीएटी (VVPAT) डेटाची पडताळणी करण्यासाठी अर्ज सादर केले आहेत.
मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या (CEO) कार्यालयानुसार 755 निवडणूक बूथच्या ईव्हीएम आणि व्हीव्हीपीएटीसाठी पुन्हा पडताळणी प्रक्रिया केली जाईल.
अर्ज दाखल केलेल्या प्रमुख उमेदवारांमध्ये ठाण्यातील (thane) कोपरी पाचपाखाडीमधून एकनाथ शिंदे (eknath shinde) यांच्या विरोधात लढलेले केदार दिघे, बारामतीतून अजित पवार यांच्या विरोधात लढलेले युगेंद्र पवार, मुक्ताईनगरमधून राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांची कन्या रोहिणी खडसे, घनसावंगीमधून माजी मंत्री राजेश टोपे, माजी मंत्री राजेश टोपे यांचा समावेश आहे.
तसेच हितेंद्र ठाकूर आणि त्यांचा मुलगा क्षितिज ठाकूर यांचाही वसईतील आणि नालासोपारा (nala sopara) मतदारसंघाबाबत पडताळणीसाठी अर्ज केले आहेत
संगमनेरमध्ये पराभूत झालेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनीही या प्रक्रियेसाठी अर्ज केला आहे. त्यांच्याशिवाय शिवसेनेचे उमेदवार विनोद घोसाळकर (दहिसर), नसीम खान (चांदिवली), फहाद अहमद (अणुशक्तीनगर) हे उमेदवार आहेत.
हेही वाचा