बोरिवली - संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील आदिवासी बांधव आणि श्रमजीवी संघटना यांच्यावतीनं वनरक्षक संचालक आणि संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.
लाकडे, पालापाचोळा, गवत काढण्याच्या आधिकारांवर बंदी घातल्यामुळे या भागातील आदिवासींचं जीवन विस्कळीत झालंय. तसंच इंधनाचा अभाव असल्यामुळे इथल्या महिलांना चुलीवर स्वयंपाक करावा लागत असल्यानं उदरनिर्वाहाचा प्रश्न उपस्थित झाला आहे. त्यामुळे श्रमजीवी संघटनेचे संस्थापक विवेक पंडित यांच्या नेतृत्वाखाली हजारो आदिवासी बांधवानी मोर्चा काढला.