वडाळा - गेल्या 70 वर्षांत काँग्रेसने विविध योजना नागरिकांच्या सोयीसाठी देशात आणल्या आणि त्या यशस्वीरीत्या राबविल्या आहेत. त्यामुळेच भाजपाला या योजनांवर काम करणे सोपं जात आहे. तरीही काँग्रेसने काही काम केलं नसल्याची टीका भाजपावाले करतात हे लाजिरवाणं असल्याचं सांगत माजी खासदार एकनाथ गायकवाड यांनी भाजपावर जोरदार टीका केली.
कै. कामराज चौक नामकरण सोहळ्याचे प्रियदर्शनी हॉलमध्ये जागृती सामाजिक प्रतिष्ठान आणि आधार सामाजिक सेवा समिती सायन कोळीवाडा काँग्रेसच्यावतीनं आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन माजी खासदार एकनाथ गायकवाड यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी माजी खासदार, माजी अध्यक्ष तामिळनाडू कुमरी आनंदन, जिल्हा अध्यक्ष हुकुमराज मेहता, मुंबई अनुसुचित जाती विभागाचे अध्यक्ष कचरू यादव आदी मान्यवर उपस्थित होते.