भाजप सरकारनं निवडणुकीअाधी रोजगार उपलब्ध करून देण्याचं अाणि उद्योगनिर्मितीचं अाश्वासन दिलं होतं. मात्र अाश्वसनांची पूर्तता केली नसल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांनी मंत्रालयाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर सरकारविरोधात घोषणाबाजी करत 'भोपळा फोड' आंदोलन केले. त्यामुळे प्रवेशद्वारावर असलेल्या पोलिसांची काही काळासाठी धावपळ उडाली होती.
सोमवारी दुपारच्या वेळेस राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावर तोबा गर्दी केली होती. कार्यकर्त्यांनी सरकारविरोधात घोषणा देण्यास सुरुवात केली. काही वेळातच भाजप सरकारचा निषेध करत भोपळा फोडून आंदोलन केलं.
सत्तेत येण्यापूर्वी तरुण बेरोजगारांना आकर्षित करण्यासाठी दरवर्षी बेरोजगारांना रोजगारांच्या संधी उपलब्ध करून देणार, उद्योग मोठ्या प्रमाणावर आणणार असल्याच्या घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या होत्या. मात्र चार वर्षे झाली तरी राज्य सरकारनं अापल्या घोषणांची पूर्तता केली नसल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते राजूरकर यांनी व्यक्त केलं. त्यामुळेच राज्य सरकारच्या विरोधात भोपळा फोड आंदोलन केल्याचं त्यांनी सांगितलं.
दरम्यान, काही वेळ पोलिसांचीही तारांबळ उडाली होती. मंत्रालयाच्या प्रवेशद्वाराजवळील पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतलं असून त्यांची रवानगी मरीन लाईन्स पोलीस ठाण्यात करण्यात अाली आहे.
हेही वाचा -