Advertisement

ADR अहवालानुसार, भाजपकडे सर्वाधिक श्रीमंत आमदार

असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्सने मंगळवारी, 26 नोव्हेंबर रोजी अहवाल प्रसिद्ध केला आहे.

ADR अहवालानुसार, भाजपकडे सर्वाधिक श्रीमंत आमदार
SHARES

असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्सने मंगळवारी, 26 नोव्हेंबर रोजी अहवाल प्रसिद्ध केला आहे. या अहवालातून महाराष्ट्राच्या (maharashtra) 15 व्या विधानसभेच्या नवनिर्वाचित आमदारांचे (MLAs) गुन्हेगारी नोंद (criminal records), आर्थिक पार्श्वभूमी (financial background), शिक्षण, वय आणि लिंग तपशील उघड झाले आहेत.

23 नोव्हेंबर रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर केल्यानंतर महायुतीने (mahayuti) दणदणीत विजय मिळवला.

आमदारांच्या गुन्हेगारी नोंदी : 

 118 (41%) विजयी उमेदवारांविरुद्ध गंभीर गुन्हे दाखल केले गेले आहेत.

3 विजयी उमेदवारांविरुद्ध खुनाशी संबंधित (IPC कलम-302) आणि जन्मठेपेच्या (IPC कलम-303) शिक्षेसंबंधित खटले दाखल केले गेले आहेत.

11 विजयी उमेदवारांविरुद्ध खुनाच्या प्रयत्नाशी संबंधित खटले (IPC कलम-307) दाखल केले गेले आहेत.

10 विजयी उमेदवारांविरुद्ध महिलांवरील गुन्ह्यांशी संबंधित प्रकरणे दाखल केली गेली आहेत. या 10 विजयी उमेदवारांपैकी 1 विजयी उमेदवारावर बलात्काराशी संबंधित आरोप केला गेला आहे. (IPC कलम-376).

भाजपच्या (bjp) 132 विजयी उमेदवारांपैकी 92 (70%), शिवसेनेच्या 57 विजयी उमेदवारांपैकी 38 (67%), राष्ट्रवादीच्या 41 विजयी उमेदवारांपैकी 20 (49%), शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)  20 विजयी उमेदवारांपैकी 13 (65%) , काँग्रेसकडून 16 विजयी उमेदवारांपैकी 9 (56%) यांच्याविरुद्ध गुन्हेगारी खटले असल्याचे नमूद केले आहे.

तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार) 8 विजयी उमेदवारांपैकी 5 (63%) आणि SP मधील 2 विजयी उमेदवारांपैकी दोन्ही (100%) उमेदवारांविरुद्ध गुन्हेगारी खटले असल्याचे नमूद केले आहे.

निवडणुकीत जिंकून आलेले श्रीमंत उमेदवार:

क्र.

नाव 

जिल्हा

मतदारसंघ

पक्ष

1

पराग शाह

मुंबई उपनगर

घाटकोपर पूर्व

भाजप

2

प्रशांत रामशेठ ठाकूर

रायगड

पनवेल

भाजप

3

मंगल प्रभात लोढा

मुंबई शहर

मलबार हिल

भाजप

निवडणुकीत जिंकून आलेले कमी श्रीमंत असलेले उमेदवार: 

क्र.

नाव

जिल्हा

मतदारसंघ

पक्ष

1

साजिद खान पठाण

अकोला

अकोला पश्चिम

कॉंग्रेस

2

श्याम रामचरण खोडे

वाशिम

वाशिम (दक्षिण-मध्य)

भाजप

3

गोपीचंद पुंडलिक पडाळकर

सांगली

जत

भाजप

शिक्षण:  

अहवालानुसार, 105 (37%) विजयी उमेदवारांची शैक्षणिक पात्रता 5वी पास ते 12वी उत्तीर्ण असल्याचे स्पष्ट झाले आहे. तर 165 (58%) विजयी उमेदवारांनी पदवी आणि त्याहून अधिक शैक्षणिक पात्रता असल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, 14 विजयी उमेदवार डिप्लोमाधारक आहेत आणि 2 विजयी उमेदवारांचे शिक्षण केवळ साक्षर असल्याचे नमूद केले आहे.

वय: 

अहवालात असेही दिसून आले आहे की 26% (75) आमदार ज्येष्ठ नागरिक आहेत, जे 61 ते 80 वयोगटातील आहेत. तसेच 24 आमदार (8%) हे 25-40 वयोगटातील आहेत.

याशिवाय, 187 (65%) विजयी उमेदवारांचे वय 41 ते 60 वयोगटातील आहे.

लिंग: 

22 (8%) विजयी उमेदवार महिला आहेत.



हेही वाचा

महापालिका मुदतीपुर्वी गोखले पुलाचे काम पूर्ण करणार?

पश्चिम रेल्वेवर एसी लोकलच्या 13 फेऱ्यांमध्ये वाढ

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा