मनसे अध्यक्ष राज ठाकरे (raj thackeray ayodhya visit) जून महिन्यात अयोध्येच्या दौऱ्यावर जाणार आहेत. पण त्यांच्या या दौऱ्याला भाजपचे खासदार बृजभूषण शरण सिंह (bjp mp brij bhushan sharan singh) यांनी विरोध केला आहे.
ते म्हणाले की, राज ठाकरेंना अयोध्येत पाय ठेवू देणार नाही, त्यांनी उत्तर भारतीयांचा अपमान केला आहे. त्यांनी आधी उत्तर भारतीयांची माफी मागावी.
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे ५ जून रोजी अयोध्येत जाणार आहे. त्यांच्या या दौऱ्याची जोरदार तयारी सुरू आहे. तर दुसरीकडे उत्तर प्रदेशमधील भारतीय जनता पार्टी (भाजपा) चे खासदार बृजभूषण शरण सिंह यांनी राज ठाकरे यांना थेट इशारा दिला आहे.
योगी आदित्यनाथ यांनी राज ठाकरे यांची भेट नाकारावी. जोपर्यंत राज ठाकरे उत्तर भारतीयांची माफी मागत नाही तोपर्यंत त्यांना भेट देऊ नये, असा सल्लाही सिंह यांनी मुख्यमंत्री योगीआदित्यनाथ यांना दिला आहे. याबाबत ते आदित्यनाथ यांना पत्र लिहल्याचं देखील बोललं जातंय.
बृजभूषण सिंह हे कैसरगंजचे भाजपचे खासदार आहे. त्यांनी ट्वीट करून 'राज ठाकरे यांना उत्तर भारतीयांचा वेळोवेळी अपमान केला आहे. त्यामुळे त्यांनी हात जोडून माफी मागावी मगच अयोध्येला यावे' असं म्हटलं आहे.
हेही वाचा