राज्याचे अल्पसंख्याक मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी भाजपाने मुंबईत मोर्चा काढला आहे. या मोर्च्याचे नेतृत्व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस करत आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, सुधिर मुनगंटीवार, यांसह अनेक नेतेमंडळी उपस्थित आहेत.
भाजपाच्या या आंदोलनानंतर सुद्धा सरकारनं मंत्री नवाब मलिकांचा राजीनामा घेतला नाही तर, घेतला नाही तर जनआंदोलन करू असं भाजपा नेते सुधीर मुनघंटीवार यांनी एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं. भाजपानं नवाब मलिकांच्या राजीनाम्यासाठी मुंबईतील आझाद मैदानापासून ते मेट्रो सिनेमापर्यंत काढला जात आहे. देवेद्र फडणवीस हे या मोर्चाच नेतृत्व करत आहेत.
आर्थिक गैरव्यवहार (मनी लॉन्डिरग) प्रकरणी राज्याचे अल्पसंख्याक मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांना अटक करण्यात आली. सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) ही कारवाई केली. ईडीच्या कारवाईनंतर भाजपानं मलिकांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. मात्र, अद्याप अटक न झाल्यानं भाजपानं आता आक्रमक पवित्रा हाती घेतला आहे.