Advertisement

पूनम महाजन यांच्या निवडीचा जल्लोष


पूनम महाजन यांच्या निवडीचा जल्लोष
SHARES

सांताक्रूझ - खासदार पूनम महाजन यांची भारतीय जनता युवा मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झालीय. त्यांचे अभिनंदन करण्यासाठी भाजपाच्या अनेक कार्यकर्त्यांची शनिवारी येथील भाजपा कार्यालयात गर्दी झाली होती. सांताक्रूझ पूर्व कलिना विधानसभा मतदारसंघातल्या भाजपाच्या जनसंपर्क कार्यालयासमोर ढोल-ताशांचा गजर करून पूनम महाजन यांचं अभिनंदन करण्यात आलं.
"जोशमध्ये काम करताना होशही सांभाळायला हवा," असा सल्ला पूनम महाजन यांनी दिला. "1996मध्ये प्रमोद महाजन हे राष्ट्रीय युवा मोर्चाचे अध्यक्ष झाले होते आणि आता माझी निवड झाली आहे. हे मी माझं सौभाग्य समजते," अशा भावनाही त्यांनी व्यक्त केल्या.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा