Advertisement

प्रदर्शन संपलं, पसारा तसाच


प्रदर्शन संपलं, पसारा तसाच
SHARES

गोरेगाव - बिंबिसारनगरमध्ये आमदार सुनील प्रभू आणि राज्यमंत्री रवींद्र वायकर यांच्या सहकार्यानं ग्राहक पेठ आणि विक्रीचे आयोजन करण्यात आलं होतं. हे प्रदर्शन दोन दिवसांपूर्वीच संपलं, मात्र प्रदर्शनासाठी वापरण्यात आलेलं सामान, पंखा, टेबल, बॅनर हे सगळं सामान तसंच पडलं आहे. स्टॉल्स तसेच असल्यानं स्थानिकांना जा-ये करण्यातही अडचणी येत आहेत. याबाबत विचारलं असता आयोजक एस. शिरीषकर यांनी तात्काळ ही जागा साफ केली जाईल, असं सांगितलं.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा