Advertisement

महिलांना दरमहा 3000, मोफत बस प्रवास : कॉंग्रेसचा जाहीरनामा

इतर पक्षांप्रमाणेच काँग्रेस पक्षानेही आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी जाहीरनाम्याचे अनावरण केले.

महिलांना दरमहा 3000, मोफत बस प्रवास : कॉंग्रेसचा जाहीरनामा
SHARES

महाराष्ट्रात (maharashtra) सध्या विधानसभा निवडणुकीचे (maharashtra vidhan sabha election 2024) वातावरण आहे. नोव्हेंबरच्या येत्या 20 तारखेला विधानसभेचे मतदान होणार असून 23 तारखेला निवडणुकीचा निकाल लागणार आहे. निवडणुकीच्या काळात सर्व पक्ष जोरदार तयारी करत आहेत.

अशातच अनेक पक्षांनी आपला प्रचार करण्यास सुरुवात केली आहे. या प्रचारादरम्यान अनेक पक्ष आपला जाहीरनामा प्रसिद्ध करत आहेत. या जाहीरनाम्यातून पक्षाद्वारे राबवण्यात येणाऱ्या योजनांची माहिती दिली जाते. 

इतर पक्षांप्रमाणेच काँग्रेस पक्षानेही आपला जाहीरनामा (manifesto) प्रसिद्ध केला आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी (rahul gandhi) यांनी जाहीरनाम्याचे अनावरण केले. या जाहीरनाम्यातून राहुल गांधींनी लोकांच्या हितासाठी योजलेल्या कामांची माहिती दिली.

या जाहीरनाम्यानुसार महिलांना दरमहा 3,000 रुपये आणि महालक्ष्मी योजनेंतर्गत महिला व मुलींना मोफत बस प्रवास दिला जाणार आहे. तसेच शेतकऱ्यांना 3 लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी आणि नियमित कर्ज परतफेडीसाठी 50,000 रुपयांची रक्कम मिळणार आहे.

जाहीरनाम्यानुसार राज्यात जातनिहाय जनगणना करण्यात येणार येईल आणि  50 टक्के आरक्षण मर्यादा हटविण्यात येणार आहे. तसेच 25 लाख रुपयांपर्यंतचा आरोग्य विमा आणि मोफत औषधे देण्याची योजना सुरू करण्यात येणार आहे.  बेरोजगार तरुणांना दरमहा 4,000 रुपयांपर्यंतची मदत केली जाणार आहे.

मुंबईत (mumbai) झालेल्या सभेत जनतेला संबोधित करताना राहुल गांधी म्हणाले, "ही विचारधारेची लढाई आहे. एकीकडे भाजप आणि आरएसएस आहे, तर दुसरीकडे काँग्रेसचीयुती आहे. एकीकडे बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान आणि समानतेची शिकवण आहे. तर, दुसरीकडे भाजप (bjp) आणि आरएसएस संविधान रद्द करण्याचा प्रयत्न करत आहेत.

तसेच राहुल गांधींनी यावेळेस भाजप सरकारवर महागाई आणि बेरोजगारी वाढल्याचा आरोप देखील केला. 



हेही वाचा

अमित ठाकरेंनंतर भाजपाचा मनसेच्या या उमेदवाराला पाठिंबा

मुंबईतील हवेची पातळी खालावली

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा