माझगाव - माझगाव ताडवाडी प्रभाग क्र 210 मध्ये सोमवारी संध्याकाळी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस कमिटीच्या वतीने कार्यकर्ता मेळावा घेण्यात आला. हा मेळावा काँग्रेसच्या प्रभाग क्र.210 च्या उमेदवार सोनम जामसुतकर यांच्या प्रचाराच्या हेतूने घेण्यात आला. या मेळाव्याला काँग्रेसचे काळबादेवीचे आमदार अमीन पटेल, भायखळ्याचे माझी आमदार मधू चव्हाण आणि 208 चे नगरसेवक मनोज जामसुतकर तसंच कार्यकर्त्यांनी उपस्थिती लावली. या मेळाव्यात अमीन पटेल आणि मधू चव्हाण यांनी सोनम जामसुतकर यांना निवडून देण्यासाठी कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागण्याचे आवाहन केलं.