Advertisement

बिनधास्त खा…हाॅटेलातही कोंबडी, मटण, मासे मिळणार- अजित पवार

सरकारने अंडी, कोंबडी, मटण, माशांची विक्री करण्यासोबतच नाॅनव्हेज खाद्यपदार्थ हाॅटेलांमध्ये बनवण्यासही मुभा दिल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (deputy cm ajit pawar) यांनी दिली.

बिनधास्त खा…हाॅटेलातही कोंबडी, मटण, मासे मिळणार- अजित पवार
SHARES

कोरोनाच्या (Coronavirus) पार्श्वभूमीवर देशभरात लागू करण्यात आलेल्या संचारबंदीतून जीवनावश्यक वस्तूंना वगळण्यात आलंय. त्यानुसार बाजारात अन्नधान्य, पालेभाज्या, फळे माफक प्रमाणात उपलब्ध होत असल्या, तरी नाॅनव्हेज प्राणप्रीय असलेल्या व्यक्तींची चांगलीच गैरसोय होत आहे. परंतु त्याच त्याच भाज्या खाऊन कंटाळलेल्या नाॅनव्हेज (non veg food) शौकीनांना राज्य सरकारने दिलासा दिला आहे. सरकारने अंडी, कोंबडी, मटण, माशांची विक्री करण्यासोबतच नाॅनव्हेज खाद्यपदार्थ हाॅटेलांमध्ये बनवण्यासही मुभा दिल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (deputy cm ajit pawar) यांनी दिली.

तोंडाची चव गेली

संचारबंदीमुळे गेल्या आठवड्याभरापासून पालेभाज्या खाऊन खाऊन मांसाहारी पदार्थांच्या शौकीनांच्या जीभेची अक्षरश: चव गेली आहे. संचारबंदीमुळे बहुतेक ठिकाणची मटणाची दुकाने, मासळी बाजार बंदच आहेत. त्यामुळे इच्छा असूनही या शौकीनांना मारून मुटकून पालेभाज्या, कडधान्ये खावी लागत आहे. अशा स्थितीत राज्य सरकारचा हा निर्णय मांसाहाराच्या शौकीनांसाठी मोठा वरदानच ठरू शकतो. कारण जीभेची थोडी चव बदलायची असेल, चमचमीत खायचं असेल, तर आता हाॅटेलातूनही हे पदार्थ मागवता येणार आहेत.

हेही वाचा- हिच तर खरी वेळ... खासगी क्लिनिक सुरू ठेवा, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या सूचना

स्वच्छता पाळा, काळजी घ्या

अंडी, कोंबडी, मटण, गोड्या व खाऱ्या पाण्यातल्या मासळीच्या (egg, chiken, mutton and fish) विक्रीवर कोणतेही बंधन नाही, असं स्पष्ट करतानाच जनतेच्या सोयीसाठी राज्यातल्या हॉटेलांना त्यांचे किचन सुरू ठेऊन खाद्यपदार्थ घरपोच किंवा सोसायट्यांपर्यंत पोहोचवण्यास परवानगी देण्यात आलीय. फक्त खाद्यपदार्थ बनवणाऱ्या व पोहोचवणाऱ्या व्यक्तींनी स्वच्छता ठेवायला हवी, असं अजित पवार यांनी सांगितलं आहे.

कोकणातील आंबे, नाशिकची द्राक्षे, नागपूरची संत्री, केळी, कलिंगड अशी सर्वप्रकारची फळे बाजारात विकता येणार आहेत. मात्र, विक्रीकर आणि खरेदीदार असे दोघांनीही ‘कोरोना’संदर्भात आवश्यक स्वच्छता आणि सुरक्षितता बाळगायची आहे. गर्दी व त्यामुळे होणारा संसर्ग टाळून खरेदी करायची आहे, असं आवाहनही पवार यांनी केलं आहे. 

नागरिकांना जीवनावश्यक पदार्थ खरेदी करता येतील. दूध, भाजीपाला, फळांची वाहतूक करणाऱ्या वाहनांना इंधनाचा पुरवठा करण्यात कोणताही अडथळा नाही. साखर कारखान्यात गाळपासाठी ऊस आणण्यास परवानगी आहे.मात्र, ऊसतोड मजुरांच्या जेवणाची काळजी संबंधित कारखान्यांच्या व्यवस्थापनांना घ्यावी लागणार आहे, असं ते म्हणाले.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा