Advertisement

विजय मिळूनही नवी मुंबईत शिवसेना-भाजप युतीसाठी धोक्याची घंटा

शहरातील दोन्ही विधानसभा मतदारसंघातील आघाडी जवळपास 75 टक्क्यांनी कमी झाली आहे.

विजय मिळूनही नवी मुंबईत शिवसेना-भाजप युतीसाठी धोक्याची घंटा
SHARES

ठाणे लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्के यांचा विजय झाला. शिवसेनेचे (यूबीटी) दोन वेळा विद्यमान खासदार राहिलेले राजन विचारे यांचा पराभव त्यांनी केला. पण तरीही नवी मुंबईत शिवसेना आणि भाजपसाठी चिंतेचे कारण आहे. शहरातील दोन्ही विधानसभा मतदारसंघातील आघाडी जवळपास 75 टक्क्यांनी कमी झाली आहे. हिंदुस्थान टाईम्सने या संदर्भातील वृत्त दिले आहे. 

दरम्यान, शहरातील आघाडीचे नेते गमावलेल्या शिवसेनेला (यूबीटी) पुन्हा पाय रोवण्यासाठी आणखी कसरत करावी लागणार आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या पाठिंब्यानंतरही ते चांगली कामगिरी करू शकले नाही.

ऐरोली आणि बेलापूर या दोन्ही विधानसभा मतदारसंघांचे प्रतिनिधित्व अनुक्रमे भाजपचे आमदार माजी मंत्री गणेश नाईक आणि मंदा म्हात्रे करत आहेत. 2019 मध्ये या दोघांनी 78,491 आणि 43,597 च्या मोठ्या फरकाने आरामात विजय मिळवला होता, जेव्हा भाजपला शिवसेनेने पाठिंबा दिला होता.

2019 च्या लोकसभा निवडणुकीत नवी मुंबईत शिवसेनेचे महायुतीचे उमेदवार विचारे यांना 84,087 मतांनी आघाडी मिळाली होती. आता म्हस्के यांच्याकडे 62,040 मतांची घट होऊन केवळ 22,047 ची आघाडी आहे. ऐरोली विभागात यापूर्वीच्या 44,362 विरुद्ध 9,735 मतांची आघाडी आहे. बेलापूर विभागात 2019 मध्ये 39,724 विरुद्ध 12,312 मतांची आघाडी आहे. विचारे 303 बूथवर आघाडीवर आहेत, तर म्हस्के 506 वर आघाडीवर आहेत.

नवी मुंबई हा नाईकांचा बालेकिल्ला असूनही कमी झालेली आघाडी आणि शहरातील शिवसेनेचे प्रमुख नेते एकनाथ शिंदे यांच्या छावणीकडे वळल्याने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी मतभेदाचा इतिहास असल्याने नाईक म्हस्के यांना पाठिंबा देतील की नाही, याबाबत साशंकता होती. माजी खासदार संजीव नाईक हे उमेदवारीचे दावेदार होते. भाजपच्या स्थानिक नेत्यांनी तर म्हस्के यांच्याविरोधात बंड करून राजीनामे सादर केले होते. मात्र, गणेश नाईक यांचे धाकटे सुपुत्र, भाजपचे शहरप्रमुख संदीप नाईक यांनी म्हस्के यांच्यासाठी व्यापक प्रचार करून आणि सर्व रोड शोला नाईक उपस्थित असल्याची खात्री करून त्यांना पक्षाने पाठिंबा दिला.

शहरातील प्रचाराची धुरा सांभाळणाऱ्या शिवसेनेच्या उपनेता विजय नाहाटा यांनी हिंदुस्थान टाईम्सला सांगितले की, "सर्व प्रचाराला न जुमानता शहर एकनाथ शिंदे यांच्या पाठीशी उभे राहिले आणि म्हस्के यांचा विजय निश्चित केला.

ते पुढे म्हणाले, "आमच्याकडून निश्चितच खूप अपेक्षा होत्या कारण शिवसेना आणि भाजप हे दोन्ही पक्ष या प्रदेशात मजबूत आहेत, आणि युतीच्या सर्वांनी उमेदवारासाठी काम केले आहे. निकाल पाहता सर्वांनी आत्मचिंतन करणण्याची आवश्यक्ता आहे. भविष्यातील निवडणुकांमध्ये आमची कामगिरी कशी सुधारेल यासाठी आम्ही निकालांचे विश्लेषण करत आहोत.

शिवसेना शहर संपर्कप्रमुख किशोर पाटकर म्हणाले, "शहरासाठी नवे उमेदवार असूनही म्हस्के यांनी आघाडी घेतली आहे. शहराने आमचे नेते एकनाथ शिंदे यांच्यावर विश्वास दाखवला आहे, आणि तो महत्त्वाचा आहे. प्रत्येक निवडणूक वेगळी असते. आगामी निवडणुकीत आम्ही आणखी मजबूत होऊ असा विश्वास आहे.

निकालावर भाष्य करताना माजी आमदार संदीप नाईक म्हणाले, "भाजपच्या किंवा शहरातील नसलेल्या उमेदवाराच्या प्रचारासाठी आमच्याकडे अवघे 16 दिवस होते. नवी मुंबईने महाराष्ट्रात दिसून आलेल्या ट्रेंडला प्रत्यक्षात उतरवून डॅमेज कंट्रोल केले आहे.

ते पुढे म्हणाले, "विधानसभा निवडणुकीसाठी, आम्ही अर्थातच मतदानाच्या पद्धतीचे विश्लेषण करत आहोत आणि कोणत्या गटाने आम्हाला पाठिंबा दिला आणि कोणत्या नाराज आहेत. हे उघड आहे की आम्हाला एकत्र येऊन लढण्याची गरज आहे."

नरेश म्हस्के म्हणाले, "नवी मुंबईत मला एकही मत मिळणार नाही, असा अपप्रचार करण्यात आला होता. मात्र, नवी मुंबईकरांनी मला येथे आघाडी दिली आहे."



हेही वाचा

"हा भटकणारा आत्मा तुम्हाला सोडणार नाही..." : शरद पवार

4 जूनला मतमोजणी केंद्रावर मोबाईलसह फिरणारा व्यक्ती कोण?

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा