राज्याचे कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांच्या अडचणींमध्ये आता आणखी वाढ होताना दिसत आहे. मुंडे यांनी निवडणूक प्रतिज्ञापत्रात माहिती लपवल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यांनी पहिल्या पत्नीच्या नावावरील मालमत्ता आणि कोर्टातील प्रलंबित प्रकरणांची माहिती लपवली असल्याचा आरोप करत करुणा शर्मा यांनी न्यायालयात धाव घेतली होती.
करुणा शर्मा या धनजय मुंडे यांच्या पहिल्या पत्नी आहेत. देखभाल खर्च देण्यात यावा आणि कुठल्याही प्रकारची दुखापत करण्यात येऊ नये असे निर्देश आणि 1,25,000 रुपयाचा मासिक खर्च देण्यात यावा असे निर्देश कोर्टाने दिले.
करुणा शर्मा याच धनंजय मुंडे यांच्या प्रथम पत्नी असल्याचा कोर्टाचा निर्वाळा आहे. या प्रकरणात घरगुती हिंसाचार झाल्याचा दावा देखील कोर्टानं मान्य केला आहे.
करुणा मुंडे पुढे म्हणाल्या की, मागच्या तीन वर्षांपासून मी खूप त्रास भोगला आहे. फक्त पोटगीसाठी मला खूप संघर्ष करावा लागला. पतीशिवाय एका महिलेले जीवन जगणे खूप अवघड असते. आपला पती जेव्हा उच्च पदावर असतो, तेव्हा पूर्ण व्यवस्था त्याच्याबाजूने काम करत असते. त्यांच्याकडे मोठ मोठे वकील होते. तरीही मी ही लढाई लढली. माझ्या वकिलांनी प्रामाणिकपणे लढून मला न्याय मिळवून दिला, याबद्दल मी त्यांचेही आभार मानते.
हेही वाचा