मुलुंड - मुलुंडच्या महानगरपालिका कार्यालयात टी वॉर्ड येथे आरपीआयच्यावतीनं मोर्चा काढण्यात आला. 26 नोव्हेंबरला मुलुंड चेकनाका येथील लाल बहाद्दूर शास्त्री मार्ग येथे महानगर पालिकेचे काही कर्मचारी वृक्षांच्या फांद्या तोडत होते. तेव्हा आरपीआय पक्षातील पदाधिकारी विनोद जाधव यांनी पालिका कर्मचाऱ्यांना वृक्ष तोडत असल्याचा जाब विचारला होता. याच गोष्टीचा राग मनात धरून पालिका कर्मचाऱ्यांनी विनोद जाधव यांची सरकारी कामात अडथळा आणल्या बाबत मुलुंड पोलीस ठाण्यात कलम 353 आणि 506 नुसार गुन्हा दाखल केला होता. या विरोधात आरपीआय कार्यकर्त्यांनी मुलुंड कचरा डेपो ते टी वॉर्ड कार्यालयापर्यंत मोर्चा काढला. खोटी तक्रार ताबडतोब मागे घ्यावी अशी मागणी विनोद जाधव यांनी यावेळी केली. तसेच यासंदर्भात माहिती घेऊन तक्रार मागे घेतली जाईल असं आश्वासन अतिरिक्त आयुक्त प्रशांत सपकाळे यांनी दिलंय.