Advertisement

Aaditya thackeray opposes coal mine site: प्रस्तावित कोळसा खाणीच्या लिलावाला आदित्य ठाकरेंचा विरोध

चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाजवळील खाण साईटच्या प्रस्तावित लिलावाला राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी विरोध केला आहे.

Aaditya thackeray opposes coal mine site: प्रस्तावित कोळसा खाणीच्या लिलावाला आदित्य ठाकरेंचा विरोध
SHARES

चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाजवळील खाण साईटच्या प्रस्तावित लिलावाला राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे  (environment minister aaditya thackeray opposes coal mine site auction near tadoba andhari tiger reserve)यांनी विरोध केला आहे. आपल्या वन्यजीव कॉरिडॉरचा आपण असा नाश करू शकत नाही, असं म्हणत त्यांनी पर्यावरणाच्या मुद्यावर केंद्रीय पर्यावरण मंत्री  प्रकाश जावडेकर यांना पत्र लिहिलं आहे.

आदित्य ठाकरे यांनी लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे की, यापूर्वी १९९९ आणि २०११ च्या दरम्यान, मूल्यमापन केल्यानंतर दोन वेळेस खाण साईटचा लिलाव रद्द करण्यात आला होता. या प्रकल्पामुळे ताडोबा आणि अंधारीच्या वन्यजीव कॉरिडॉरचा नाश होणार आहे हे आपल्याला माहित असताना आपण या प्रक्रियेसाठी पुन्हा वेळ आणि शक्ती का वाया घालवायची अशा प्रश्न आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. जवळपास १० वर्षांपूर्वी तत्कालीन केंद्रीय पर्यावरण मंत्री जयराम रमेश यांनी हा नाश थांबविला होता. त्यांनी त्या क्षेत्राचे सर्वेक्षण केलं होतं आणि खाण साईट योग्य नाही असं अहवालात सूचित केलं होतं. त्यामुळे या भागाचं पुन्हा संरक्षण करावं, अशी विनंती देखील आदित्य ठाकरे यांनी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांना केली आहे.

हेही वाचा - आदित्य ठाकरेंच्या खात्याचं नाव बदलून झालं ‘हे’

प्रस्तावित बांदर कोळसा खाण प्रकल्प हा वन्यजीव कॉरिडॉरमध्ये आहे. हे क्षेत्र व्याघ्र कॉरिडॉरमध्ये असल्याने यापूर्वी खाण प्रकल्पास असहमती दर्शविण्यात आली होती. तत्कालीन मुख्य वनसंरक्षक आणि ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक यांनीही यावर आक्षेप घेतला होता. या खाण प्रकल्पामुळे मध्य भारतात असलेले व्याघ्र संरक्ष‍ित क्षेत्र आणि वनक्षेत्र विस्कळीत होईल, त्यामुळे प्रस्तावित खाणकामास असहमती दर्शविली होती.  खाणींमुळे तसंच वाघांसाठीच्या कमी होत चाललेल्या संरक्षित क्षेत्रामुळे महाराष्ट्रात आणि विशेषत: चंद्रपूर जिल्ह्यात मानव वन्यजीव संघर्ष वाढतो आहे. त्यामुळे सध्या जी क्षेत्रे संरक्षित आहेत किमान त्यांचे तरी आपण वन्यजीव आणि पर्यावरणाकरिता संरक्षण करणे गरजेचं आहे, असं मत आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केलं.

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा