मनसे (MNS) नेते संदीप देशपांडे (sandeep deshpande) यांच्यावर हल्ला झाला आहे. सकाळी मॉर्निंग वॉकला गेल्यावर त्यांच्या शिवाजी पार्क येथे हल्ला झाला.
हल्लेखोर चेहऱ्यावर मास्क लावू आले होते. हल्ला करून हल्लेखोर पसार झाले. या हल्ल्यात देशपांडे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले.
संदीप देशपांडे यांच्या प्रकृतीबद्दल मोठी अपडेट समोर आली आहे. त्यांच्या हाताला आणि पायाला फॅक्चर झाले आहे. पायाला हेअरलाईन फॅक्चर झाले आहे. दुखापत जरी गंभीर असली तरी ते सध्या स्टेबल आहेत. त्यांच्यावर कुठल्याही प्रकारची शस्त्रक्रिया होणार नाही आहे. फक्त त्यांच्या हाताला आणि पायाला प्लॅस्टर लावण्यासाठी त्यांना ऑपरेशन थिएटरमध्ये नेण्यात आले आहे.
काही हल्लेखोर तोंडावर मास्क लावून आले होते. हल्लेखोर मारहाण करण्यासाठी स्टंप, लोखंडी रॉड घेऊन आले होते. त्यांना डोक्यावर मारण्याचा त्यांचा प्रयत्न होता, पण संदीप देशपांडे यांनी बचावासाठी हात पुढे केला. तेव्हा हल्लेखोरांनी त्यांच्या हातावर आणि पायावर मारण्यास सुरुवात केली.
शिवाजी पार्कमध्ये सकाळच्या वेळी गर्दी असते त्यामुळे त्यांना वाचवायला स्थानिकांनी धाव घेतली. हे पाहून या हल्लेखोरांनी देशपांडे यांच्यावर हल्ला करून तिथून पळ काढला. जखमी अवस्थेतील देशपांडे यांना तत्काळ हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे.
संदीप देशपांडे यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील फोन केला होता. त्यांच्या प्रकृतिची सर्व माहिती राज ठाकरेंनी स्वतः घेतली. यासोबतच हिंदुजा बाहेर मनसेचे पदाधिकारी देखील गर्दी करत आहेत.