कॉंग्रेस सोडून नुकतेच अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत गेलेले बाबा सिद्दिकी यांच्यावर गोळीबार करण्यात आला आहे. त्यांच्यावर ३ राऊंड फायरिंग करण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार त्यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी यांच्यावर 12 ऑक्टोबर 2024 रोजी मुंबईत गोळ्या झाडण्यात आल्या. ही घटना त्यांचा मुलगा झीशान सिद्दीकी यांच्या वांद्रे पूर्व येथील कार्यालयाजवळ घडली.
बाबा सिद्दीकी यांना अनेक गोळ्या लागल्याने त्यांना तात्काळ लीलावती रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. या हल्ल्यात तीन हल्लेखोरांचा समावेश होता आणि पोलिस अधिकाऱ्यांनी तपास सुरू केला आहे.
बाबा सिद्दिकी हे पूर्वी काँग्रेस पक्षात होते. लोकसभा निवडणुकीपूर्वी अजित पवार गटात प्रवेश केला होता. बाबा सिद्दिकी हे मुंबईतील नामवंत चेहऱ्यांपैकी एक आहेत.
ईदच्या काळातील बाबा सिद्दिकी यांची ईफ्तार पार्टी नेहमी चर्चेचा विषय असते. त्यांच्या इफ्तार पार्टीला बॉलिवूड सेलिब्रिटी आणि बडे राजकारणी हजेरी लावायचे.