माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यानं शनिवारी सकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांची भेट घेतली. शरद पवारांचे मुंबईतील निवासस्थान सिल्वर ओक या ठिकाणी दोघांमध्ये तब्बल अर्धा तास चर्चा झाली.
सचिन तेंडुलकर आणि शरद पवार यांच्या भेटीचं कारण अद्याप गुलदस्त्यात आहे. कोणत्या कारणासाठी ही भेट झाली याची माहिती कोणाकडूनही देण्यात आली नाही. सध्या देशात निवडणुकीचं वातावरण असल्यामुळं दोघांच्या भेटीबाबत राजकीय वर्तुळात तर्क वितर्कांना उधाण आलं आहे.
काही दिवसांपूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही शरद पवार यांची भेट घेतली होती. या भेटीवेळी राज यांनी पवारांना मनसेच्या गुढी पाडव्याच्या मेळाव्याचं आमंत्रण दिल्याचं सांगण्यात येत आहे. तसंच आता गुढी पाडव्याच्या मेळाव्याला पवार-राज यांची भेट होणार का याबाबत राजतीय वर्तुळात उत्सुकता आहे.
हेही वाचा -
ईशान्य मतदारसंघ रामदास आठवलेंसाठी सोडा - आरपीआय
भाजपाकडून सभांचा सपाटा; महिन्याभरात घेणार १ हजार सभा