गिरगाव - सी वॉर्ड परिसरातील बापटी रोड सिद्धार्थनगर येथे महापरिनिर्वाण दिनानिमित्त मेणबत्ती लावून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यात आलं. सकाळी 9 ते संध्याकाळी 6 पर्यंत डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना मानवंदना देऊन आदरांजली वाहण्याचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सुरेश कांबळे यांनी केलं. यावेळी त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांप्रती आपले विचार मांडून अभिवादन केलं.