निलमनगर - खासदार किरीट सौमय्या यांनी दिव्यांगाना कृत्रिम अवयव दान करण्याच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. या कार्यक्रमात ३५ दिव्यागांना आधुनिक कृत्रिम अवयव दान करण्यात आले. लोकसभेत नुकतेच डिसेबिलिटी बील मंजूर झाले आहे. दिव्यांगाच्या आयुष्यात आधुनिक अवयव दान करून त्यांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी लिम्ब फॉर लाईफ यांच्या माध्यमातून किरीट सौमय्या प्रयत्न करत आहे. या कार्यक्रमात केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री थावरचंद गेहलोट प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. १४ एप्रिल २०१७ नंतर या संदर्भात कायदेशीरबाबी तपासून त्याची अंमलबजावणी कशा प्रकारे करता येईल. यासाठी भारत सरकार सर्वोतोपरी प्रयत्न करत असल्याचं या वेळी थावरचंद गेहलोट यांनी सांगितलं. नव्या वर्षात अशा अनेक योजना राबवण्याचा सौमय्या यांचा मानस आहे. या योजनेतंर्गत दर रविवारी ४ कॅम्प आणि १० हजार ज्येष्ठ नागरिकांना मोफत ऐकण्याची मशीन तसंच किमान ५०० दिव्यांगाना आधुनिक अवयव दान देण्याचा मानस आहे.