Advertisement

निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा प्रिया दत्त यांचा निर्णय ठरेल का याेग्य?


निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा प्रिया दत्त यांचा निर्णय ठरेल का याेग्य?
SHARES

प्रिया दत्त यांची ओळख केवळ एक नेत्या म्हणून नाही तर एक समाजसेवक म्हणूनही आहे. त्यांचे वडिल सुनील दत्त हे २ वेळा खासदार म्हणून निवडून गेले होते. त्यांच्या निधनानंतर त्यांचा राजकारणाचा वारसा प्रिया दत्त यांनी पुढे नेला. प्रिया दत्त या उच्चशिक्षित असून त्यांनी सोफिया कॉलेजमधून आपलं समाजशास्त्राचं शिक्षण पूर्ण केलं आहे. त्यानंतर त्यांनी मीडिया क्षेत्रातील शिक्षण अमेरिकेतील न्यूयॉर्कमधून पूर्ण केलं आहे.

राजकीय कारकीर्द

प्रिया दत्त यांच्या कुटुंबात चित्रपटांचं वातावरण असलं तरी त्या यापासून दूर राहिल्या आहेत. आपल्या वडिलांच्या निधनानंतर त्यांचा वारसा पुढे नेण्यासाठी त्या राजकारणात आल्या. २००५ साली त्या पहिल्यांदा उत्तर मध्य मुंबईतून लोकसभेवर निवडून गेल्या. त्यानंतर २००९ मध्ये पुन्हा याच जागेवरून त्या लोकसभेवर गेल्या. परंतु २०१४ साली मोदी लाटेत त्यांचा भाजपाच्या पूनम महाजन यांनी पराभव केला. पूनम महाजन यांनी प्रिया दत्त यांना तब्बल १ लाख ८६ हजार मतांनी धूळ चारली.

समाजसेवेतही रस

राजकारणाबरोबरच प्रिया दत्त यांना समाजसेवेतही रस आहे. त्यांच्या अनेक उल्लेखनीय कामांमुळे त्यांची आजही प्रशंसा केली जाते. महिलांच्या हक्कांसाठी वेळोवेळी त्यांनी आवाज उठवला होता. याव्यतिरिक्त महिला आरक्षण, वेश्याव्यवसायाला कायदेशीर मान्यता, अशा अनेक मुद्द्यांवर आवाजा उठवून महिलांसमोर त्यांनी एक आदर्श ठेवला आहे.

संजय दत्तमुळे चर्चेत

प्रिया दत्त आपल्या राजकीय करिअरपेक्षा त्यांचे बंधू संजय दत्त यांच्यामुळे अधिक चर्चेत राहिल्या. मुंबई बॉम्ब ब्लास्ट प्रकरणी संजय दत्त अटकेत असताना प्रिया दत्त यांना टिकेचा सामना करावा लागला होता.

निर्णय बदलला

यापूर्वी प्रिया दत्त यांनी लोकसभा निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला होता. वाढती गटबाजी आणि पक्षश्रेष्ठींच्या दुर्लक्षामुळे त्यांनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. परंतु पक्षश्रेष्ठींकडून सांगण्यात आल्यानंतर पुन्हा एकदा प्रिया दत्त निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या. 


#MLviews

प्रिया दत्त यांची ओळख केवळ एक नेत्या म्हणून नाही तर एक समाजसेवक म्हणूनही आहे. मात्र, यंदा त्यांनी लोकसभा निवडणूक न लढणवण्याचा निर्णय घेतला होता. परंतु, पक्षश्रेष्ठींकडून सांगण्यात आल्यानंतर पुन्हा एकदा प्रिया दत्त निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या. दरम्यान, २०१४ मध्ये याच मतदारसंघातून भाजपाच्या पूनम महाजन यांनी त्यांचा पराभव केला होता. त्यामुळं यंदाच्या निवडणुकीत प्रिया दत्त, पूनम महाजन यांना पराभवाची परतफेड करणार का याकडं सर्वांचंच लक्ष लागलं आहे. 



हेही वाचा -

शिवसेनेशी जुळवून घेतलेल्या पूनम महाजन पुन्हा येतील का निवडून ?

अडथळ्यांच्या शर्यतीवर अरविंद सावंत करतील का मात?



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा