वसई (vasai) आणि नालासोपारा (nala sopara) हे महाराष्ट्रातील (maharashtra) एक महत्त्वाचे विधानसभा मतदारसंघ आहेत. हा मतदारसंघ हितेंद्र ठाकूर (hitendra thakur) यांच्या बहुजन विकास आघाडीचा (BVA) बालेकिल्ला समजला जातो. वसई आणि नालासोपारा या मतदारसंघात आजवरच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालात बहुजन विकास आघाडीचा गड शाबूत होता.
मात्र, 2024 च्या विधानसभा निवडणुकीच्या समोर आलेल्या निकालानुसार बहुजन विकास आघाडीला सुरुंग लागला आहे. अटीतटीच्या सामन्यात वसईतून भाजपच्या (bjp) स्नेहा दुबे - पंडीत (sneha dubey pandit) यांनी बहुजन विकास आघाडीच्या हितेंद्र ठाकूर यांचा दारूण पराभव केला आहे.
तसेच, नालासोपारा मतदारसंघात विजयाची हॅटट्रिक पूर्ण केलेल्या बहुजन विकास आघाडीच्या क्षितीज ठाकूर यांना यावेळेस पराभवाचा (defeat) सामना करावा लागला आहे. भाजपच्या राजन नाईक यांनी बहुमताने विजय प्राप्त केला आहे.
बहु़जन विकास आघाडीच्या दृष्टीने हा पराभव जिव्हारी लागण्यासारखा आहे. कारण वसई आणि नालासोपारा मतदारसंघ हा बहु़जन विकास आघाडीसाठी आजवर अजिंक्य ठरला होता. मात्र आता पराभवामुळे आजवरच्या इतिहासातील हा निकाल खेळी बदलणारा ठरला आहे. या निकालाचा या दोन्ही मतदारसंघाच्या राजकारणावर भविष्यात मोठा प्रभाव पडणार असल्याचे दिसून येत आहे.
2019 च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत, नालासोपारा मतदारसंघातून बहुजन विकास आघाडीचे उमेदवार क्षितिज हितेंद्र ठाकूर (kshitij thakur) यांनी 149,868 मते मिळवून विजय मिळवला होता. त्यांनी शिवसेनेचे प्रदीप रामेश्वर शर्मा यांचा पराभव केला होता.
तसेच वसई मतदारसंघातून बहुजन विकास आघाडीचे उमेदवार हितेंद्र विष्णू ठाकूर (hitendra thakur) विजयी झाले होते आणि त्यांनी SS चे विजय गोविंद पाटील यांचा 25,952 च्या फरकाने पराभव केला होता.
हेही वाचा