Advertisement

FDAचे आयुक्त अभिमन्यु काळे यांची बदली, भाजपची नाराजी

अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त अभिमन्यू काळे यांची बदली करण्यात आली आहे.

FDAचे आयुक्त अभिमन्यु काळे यांची बदली, भाजपची नाराजी
SHARES

रेमडेसिव्हरवरून राज्यात गेल्या काही दिवसांपासून जोरदार राजकारण रंगलं आहे. या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त अभिमन्यू काळे यांची बदली करण्यात आली आहे. या बदलीचं स्वागत गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हान यांनी केलीय.

तर काळे यांच्या बदली विरोधात भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केलीय. काळेंची बदली करुन ठाकरे सरकारनं सूडाचा कळस गाठल्याचा घणाघात भातखळकरांनी केलाय.

"महाराष्ट्र अडचणीत असताना स्वत:च्या परीनं महाराष्ट्राला मदत केली नाही. उलट संभ्रमाचं वातावरण निर्माण केलं. अन्न व औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे यांनाही मी कारवाईबाबत सांगितलं आणि त्यांनी होकार दिला. मुजोर अधिकाऱ्यांना बाजूला करणं योग्यच" असल्याचं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलंय. ही धमकी नाही. इतर अधिकाऱ्यांनी काय समजायचं ते समजा. का कारवाई झाली? कशामुळे झाली? याबाबत मी बोलणार नाही, असंही आव्हाडांनी म्हटलंय.

महाराष्ट्र अडचणीत असताना हे फोन बंद करून बसतात. मुजोरच होता तो, मी शब्द मागे घेणार नाही. ऑक्सिजन नाही आणि फोन लावला तर फोन बंद. माझ्यातला कार्यकर्ता अजून मेला नाही. नोकरशाह आणि सत्ताधारी एकत्र चालायला हवे, अशी अपेक्षाही आव्हाड यांनी व्यक्त केलीय.

अभिमन्यू काळे यांच्या बदलीवरुन भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी ठाकरे सरकारवर जोरदार हल्लाबोल केलाय. ‘रेमडेसीवीरसाठी भाजपला पत्र देणाऱ्या FDA आयुक्त अभिमन्यू काळेंची बदली करून ठाकरे सरकारनं सूडाचा कळस गाठला आहे. महाराष्ट्राचे हित गेले चुलीत, टक्केवारी शिवाय काहीच यशस्वी होऊ द्यायच नाहीत असा निश्चय ठाकरे सरकारने केला आहे”, असं ट्वीट भातखळकर यांनी केलंय.



हेही वाचा

अमित ठाकरे कोरोना पाॅझिटिव्ह, लिलावती रुग्णालयात दाखल

तन्मय फडणवीस हा माझा दूरचा नातेवाईक, देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा