Advertisement

उत्तर प्रदेशमध्ये मनसेचे कार्यालय, स्थानिकांची पक्षात येण्यास उत्सुकता

उत्तर भारतीयांचा विरोध करणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आता आपली भूमिका थोडी मवाळ केली आहे.

उत्तर प्रदेशमध्ये मनसेचे कार्यालय, स्थानिकांची पक्षात येण्यास उत्सुकता
SHARES

उत्तर भारतीयांचा विरोध करणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आता आपली भूमिका थोडी मवाळ केली आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी घोषणा केली की मुंबईत राहणाऱ्या उत्तर प्रदेशातील लोकांसाठी उत्तर प्रदेश सरकारचे कार्यालय मुंबईत उघडले जाईल.

त्यावर प्रतिक्रिया देताना मनसेचे ज्येष्ठ नेते बाळा नांदगावकर म्हणाले की, मुंबईत उत्तर प्रदेश सरकारचे कार्यालय सुरू होण्यास पक्षाला कोणतीही अडचण नाही. यासोबतच ते म्हणाले की, उत्तर प्रदेशातील अयोध्येत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पक्ष कार्यालय सुरू झाल्याचं देखील त्यांनी सांगितले.

बाळा नांदगावकर म्हणाले की, “मला असं वाटतं की त्यांनी उघडण्यात अडचण काय? तुम्हाला कल्पना आहे का, अयोध्येमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ऑफिस उघडले आहे ते. अयोध्येमध्ये प्रॉपर. कुणाला तरी अयोध्येला पाठवा आणि माहिती घ्या. अयोध्येमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ऑफिस उघडलेले आहे. ऑफिशयली तिकडे लोकं बसतात. तिकडे कार्यकर्ते तयार होत आहेत. आम्ही कोण भेटलो पण नाही. पण कार्यकर्त्यांची मागणी आलेलली आहे तिकडून.”

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी यापूर्वीच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे कौतुक केले आहे. यासोबतच त्यांनी येत्या ५ जूनला अयोध्या दौऱ्याची घोषणा केली आहे. या दौऱ्यात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचीही भेट घेणार असल्याचे मनसे प्रमुख म्हणाले.

पण राज ठाकरेंच्या या दौऱ्याला भाजप खासदार बृजभूषण सिंह (Brijbhushan Singh) यांनी विरोध केला आहे.

राज ठाकरे यांनी उत्तर भारतीयांची माफी मागावी, अन्यथा त्यांना अयोध्येत पाऊल ठेवू देणार नाही, असा इशारा बृजभूषण यांनी दिला आहे. बृजभूषण सिंह यांनी राज ठाकरे यांच्या दौऱ्याला विरोध दर्शवत स्थानिक साधूसंत आणि महंतांच्या उपस्थितीत रॅली काढली.

बृजभूषण म्हणाले की, 'राज ठाकरेंनी उत्तर भारतीयांवर केलेला अत्याचार आम्ही विसरणार नाही. साधूसंतांनी राज ठाकरेंना माफ केलं तरच राज यांनी अयोध्येत प्रवेश देण्याबद्दल विचार करू. राज ठाकरे यांनी उत्तर भारतीयांच्या भावना दुखावल्या आहेत. साधूसंत आणि अयोध्यावासी राज ठाकरे यांच्यावर नाराज आहेत. त्यामुळे राज ठाकरे यांनी उत्तर भारतीयांची माफी मागावी.'



हेही वाचा

उत्तर भारतीयांच्या मुंबईतील कार्यालयाला मनसेचा विरोध नाही

राज ठाकरेंनी उत्तर भारतीयांची माफी मागावी, अन्यथा... भाजप खासदाराचं चॅलेंज

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा