Advertisement

मनसे नेते अविनाश जाधव यांचा राजीनामा

विधानसभा निवडणुकीत झालेल्या खराब कामगिरीची जबाबदारी आपल्यावर घेत त्यांनी या पदाचा राजीनामा दिला आहे.

मनसे नेते अविनाश जाधव यांचा राजीनामा
SHARES

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) ठाणे-पालघर जिल्हाप्रमुख अविनाश जाधव (avinash jadhav) यांनी आपल्या पदाचा राजीनामा (resign) दिला आहे. विधानसभा निवडणुकीतील खराब कामगिरीची जबाबदारी आपल्यावर घेत त्यांनी या पदाचा राजीनामा दिला आहे.

“ठाणे-पालघर जिल्ह्यातील पक्षाच्या खराब कामगिरीची जबाबदारी मी घेत असून माझ्या पदाचा राजीनामा देत आहे,” असे जाधव यांनी पक्षप्रमुख राज ठाकरे (raj thackeray) यांना पाठवलेल्या राजीनामापत्रात म्हटले आहे.

त्याचदिवशी संध्याकाळी पक्षनिधीच्या वादातून अविनाश जाधवांच्या (avinash jadhav) समर्थकांनी मनसेचे (mns)विधानसभा निवडणुकीतील उमेदवार समीर मोरे आणि त्यांचा भाऊ अतिश मोेरे यांच्यावर हल्ला केला.

समीर मोरे आणि त्यांच्या समर्थकांनी तसेच इतर मनसे कार्यकर्त्यांनी त्यांच्या भागात पक्षासाठी काही काम न केल्याचा आरोप अविनाश जाधव यांच्यावर केला होता.

रविवारी सायंकाळी जाधव यांनी त्यांच्या समर्थकांसह बोईसर येथे जाऊन चर्चा केली होती. पण चर्चा सुरू असतानाच समीर मोरे आणि आतिश मोरे आणि त्यांच्या समर्थकांसोबत झालेल्या चर्चेला हिंसक वळण लागले. 

तसेच अविनाश जाधव यांनी अतिश मोरे यांच्यावर हल्ला केला असून अतिश मोरे यांना गंभीर जखमी केल्याचा आरोप केला जात आहे. यानंतर अतिश मोरे यांना शगुन रुग्णालयात दाखल करण्यात आले.

बोईसर पोलीस ठाण्यातील एका अधिकाऱ्याने सांगितले की, ज्या भागात ही घटना घडली तो भाग सातपाटी पोलीस ठाण्यांतर्गत येतो त्यामुळे लगेचच पोलीस पथक घटनास्थळी रवाना करण्यात आले. 

“पीडिताच्या कुटुंबातील कोणीही तक्रार नोंदवण्यासाठी पुढे आले नाही. आम्ही या प्रकरणाची चौकशी करत आहोत. मात्र, रविवारी रात्री उशिरापर्यंत या हाणामारी संदर्भात प्रथमदर्शनी नोंद झाली नव्हती.” असेही एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले



हेही वाचा

मुंबईतील 'या' रेल्वे स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकिटांवर तात्पुरती बंद

भांडुप : खासगी शाळेत तीन विद्यार्थिनींचा विनयभंग

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा