पालिकेने गुरुवारी माहीम परिसरातील एक बेकायदेीर दर्गा जमीनदोस्त केला. हा दर्गा बेकायदेशीर असून आता समुद्रावर अतिक्रमण होत असल्याचा दावा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला. माहीम खाडी येथील दर्गा गुरुवारी सकाळी कडक पोलिस बंदोबस्तात बुलडोझरने तोडण्यात आला. घटनास्थळावरून ढिगारा देखील हटवण्यात आला आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल मुंबईतील माहीम समुद्रकिना-यावरील 'दर्गा'च्या बेकायदेशीर असल्याचा आरोप मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला होता.राज ठाकरे यांनी अल्टिमेटम दिला हेता की, जर बेकायदेशीर दर्गा पाडला नाही तर त्याच्या बाजूला गणपती मंदिराची स्थापना करू. त्यानंतर प्रशासनाने गांभीर्याने त्यांची दखल घेत दर्गावर कारवाई केली आहे.
राज ठाकरे म्हणाले, "हा दर्गा कोणाचा आहे? मासळी आहे का? दोन वर्षांपूर्वी ती नव्हती, बेकायदा बांधकाम तातडीने पाडले नाही, तर त्याच ठिकाणी भव्य गणपती मंदिर उभारू."
मनसेच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून दर्ग्यातील व्हिडिओ ड्रोन फुटेज शेअर करण्यात आला आहे. माहीम येथील समुद्रात नवे ‘हाजी अली’ बांधले जात असल्याचे महाराष्ट्र सरकारवर दुर्लक्ष केल्याचा आरोप राज ठाकरे यांनी केला.
हेही वाचा