नाशिकमधील डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयाच्या आॅक्सिजन टाकीला झालेल्या गळतीमुळे तब्बल २२ रुग्णांना ऑक्सिजन अभावी आपला जीव गमवावा लागला आहे. या घटनेनंतर, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (raj thackeray) यांनी ट्विट करत जबाबदार व्यक्तीवर कडक कारवाई करण्याची मागणी व्यक्त केली आहे.
ऑक्सिजन गळतीमुळे नाशिक येथील रुग्णालयात निष्पाप रुग्णांना जीव गमवावा लागला. ही घटना अतिशय वेदनादायी आहे. मृतांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची श्रद्धांजली. आरोग्य व्यवस्थेवर प्रचंड ताण आहे, पण जर कुणाकडून बेपर्वाई झाली असेल तर त्यांना सरकारकडून कडक शासन व्हायलाच हवं, अशी मागणी राज ठाकरे यांनी ट्विटरच्या माध्यमातून केली आहे.
हेही वाचा- नाशिक दुर्घटना: देवेंद्र फडणवीसांनी केली सखोल चौकशीची मागणी
नाशिक महापालिकेच्या झाकीर हुसेन रुग्णालयाच्या ऑक्सिजन टाकीत बुधवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास टँकरमधून आॅक्सिजन भरण्यात येत असताना ही गळती सुरू झाली. यावेळी रुग्णालयात जवळपास १३१ रुग्ण उपचार घेत होते. आॅक्सिजन गळतीमुळे दाब कमी होऊन २२ रुग्णांचा मृत्यू झाल्याचं समजत आहे. तर ३ ते ४ जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचं म्हटलं जात आहे. सोबतच ६ ते ७ रुग्णांना इतर ठिकाणी हलवण्यात आल्याचंही समजत आहे.
ऑक्सिजन गळतीमुळे नाशिक येथील रुग्णालयात निष्पाप रुग्णांना जीव गमवावा लागला. ही घटना अतिशय वेदनादायी आहे. मृतांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची श्रद्धांजली. आरोग्य व्यवस्थेवर प्रचंड ताण आहे पण जर कुणाकडून बेपर्वाई झाली असेल तर त्यांना सरकारकडून कडक शासन व्हायलाच हवं.
— Raj Thackeray (@RajThackeray) April 21, 2021
या घटनेवर शोक व्यक्त करतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांनी या घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश देतानाच मृतांच्या वारसांना प्रत्येकी ५ लाख रुपये देण्याचं देखील त्यांनी जाहीर केलं आहे.
तसंच कोरोनाच्या संकटामुळे देश दुर्दैवाच्या दुष्टचक्रात सापडला आहे. कोरोनाशी विषम प्रकारची लढाई सुरू आहे. कुठं प्राणवायू नाही, कुठं औषधं नाहीत, कुठं बेड नाहीत. त्याअभावी रुग्णांचे हाल व मृत्यू होत आहेत. अशात नाशिकची ही दुर्दैवी घटना घडली आहे. या दुर्घटनेस जबाबदार असेल त्याची गय केली जाणार नाही, पण या दुर्दैवी घटनेचं राजकारणही कुणी करू नये. संपूर्ण महाराष्ट्रावर हा आघात आहे. नाशिकच्या दुर्घटनेने संपूर्ण महाराष्ट्र शोकमग्न आहे!, असं देखील मुख्यमंत्री म्हणाले.
(mns chief raj thackeray reaction on nashik hospital oxygen leak incident)