महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने २७ उमेदवारांची आपली पहिली यादी मंगळवारी सायंकाळी जाहीर केली. मनसे आगामी विधानसभा निवडणुकीत १२७ उमेदवार उतरवणार असल्याची शक्यता आहे.
शिवसेना-भाजप, काँग्रेस-राष्ट्रवादी या प्रमुख पक्षांसह बहुजन वंचित आघाडी, एमआयएम आणि आप या पक्षांनीही उमेदवारांची यादी जाहीर केल्याने मनसे आपले उमेदवार कधी जाहीर करणार याकडे कार्यकर्त्यांचं लक्ष लागलं होतं. त्यानुसार मनसेची पहिली उमेदवार यादी जाहीर झाल्याने या कार्यकर्त्यांना दिलासा मिळू शकेल.
पहिल्या यादीत प्रमोद पाटील (कल्याण ग्रामीण), प्रकाश भोईर (कल्याण पश्चिम), अशोक मुर्तडक (नाशिक पूर्व), संदीप देशपांडे (माहीम), वसंत मोरे (हडपसर), किशोर शिंदे (कोथरूड), नितीन भोसले (नाशिक मध्य), राजू उंबरकर (वणी), अविनाश जाधव (ठाणे), नयन कदम (मागठाणे), अजय शिंदे (कसबा पेठ), नरेंद्र पाटील (सिंदखेडा), दिलीप दातीर (नाशिक पश्चिम), योगेश शेवरे (इगतपुरी), कर्णबाळा दुनबळे (चेंबूर), संजय तुर्डे (कलिना), सुहास निम्हण (शिवाजी नगर), गजानन काळे (बेलापूर), अतुल वंदिले (हिंगणघाट), प्रशांत नवगिरे (तुळजापूर), राजेश येरुणकर (दहिसर), अरुण सुर्वे (दिंडोशी), हेमंत कांबळे (कांदिवली पूर्व), विरेंद्र जाधव (गोरेगाव), संदेश देसाई (वर्सोवा), गणेश चुक्कल (घाटकोपर पश्चिम), अखिल चित्रे (वांद्रे पूर्व)
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोमवारी वांद्र्यातील एमआयजी क्लब इथं पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेत पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना चार्ज केलं. सोबतच २ उमेदवारांच्या नावाचीही घोषणा केली होती. राज ठाकरे येत्या ५ आॅक्टोबरपासून प्रचारसभांचा धडाका लावणार आहेत.
हेही वाचा-
मनसेचं इंजिन चार्ज, राज ठाकरेंनी केले २ उमेदवार जाहीर
वडाळ्याची जागा कोळंबकरांना, श्रद्धा जाधव करणार का बंड?