महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते नयन कदम यांना कोरोनाची लागण झाल्याचं आढळलं आहे. सध्या त्यांची प्रकृती पूर्णपणे बरी आहे. ते सध्या घरीच क्वारंटाईन आहेत. नयन कदम यांना गेल्या काही दिवसांपासून ताप येत होता. त्यानंतर त्यांनी स्वत:ला सर्वांपासून दूर करत क्वारंटाईन केलं होतं. त्यानंतर त्यांची कोरोना चाचणी घेण्यात आली. त्यात त्यांची चाचणी पॉझिटिव्ह आली होती.
दहिसरच्या प्रभाग क्रमांक २ मधील भाजपचे नगरसेवक जगदीश ओझा यांची कोरोना चाचणी देखील पॉझिटिव्ह आली आहे. त्यांची देखील प्रकृती बरी असून ते सध्या घरीच क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ते घरातूनच त्यांची सर्व कामं करत आहेत. जगदीश ओझा यांना कोरोनाची कोणतीही लक्षणं दिसत नाहीत. मात्र खबरदारी म्हणून त्यांनी त्यांची कोरोना चाचणी केली. अखेर त्यांची चाचणी पॉझिटिव्ह आली.
काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्र मंत्रिमंडळातील मंत्री अस्लम शेख यांनाही कोरोनव्हायरसची लागण झाल्याचं समजलं होतं. ते देखील घरातच क्वारंटाईन आहेत. त्यांची सर्व कामं ते घरातूनच करत आहेत.
हेही वाचा