मनसे (mns) नेते राजन शिरोडकर यांचे मंगळवारी निधन झाले. ते काही काळापासून आजारी होते. राजन शिरोडकर हे राज ठाकरे यांच्या निकटवर्तीयांपैकी एक मानले जातात. राज ठाकरेंनी शिवसेना सोडून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली, तेव्हा राजन शिरोडकरही राज ठाकरेंसोबत होते.
राजन शिरोडकर हे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्षही राहिले आहेत.