Advertisement

मनसेचं काँग्रेस कार्यालयावर 'सर्जिकल स्ट्राइक'


मनसेचं काँग्रेस कार्यालयावर 'सर्जिकल स्ट्राइक'
SHARES

शुक्रवारी सकाळच्यादरम्यान छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसजवळील काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयाची तोडफोड करण्यात आली. पण ही तोडफोड कुणी केली याबाबत चर्चा सुरू असतानाच मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी 'महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा भैय्या संजय निरुपमच्या कार्यालयावर सर्जिकल स्ट्राईक, इट का जवाब पथ्थर से मिलेगा' असे ट्विट करत त्यांनी या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.



सीएसटीएम येथील आझाद मैदानाजवळच काँग्रेसचं प्रदेश कार्यालय आहे. शुक्रवारी सकाळच्या दरम्यान कार्यालयात कोणताही पदाधिकारी नसताना मनसेने काँग्रेसच्या या कार्यालयाच्या काचा फोडल्या, अशी माहिती मिळते. मात्र हल्लेखोरांचा तपास सुरू असताना संदीप देशपांडे यांनी ट्विट केल्यानं हा हल्ला मनसेनेच केल्याचं स्पष्ट झालं.


वादातूनच हल्ला

मागील अनेक दिवसांपासून फेरीवाल्यांच्या मुद्द्यावरून काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम आणि मनसे यांच्यातील वाद शमण्याचे नाव घेत नाही. रविवारी मनसेच्या पदाधिकाऱ्यांना फेरीवाल्यांकडून मारहाण झाली होती. त्यानंतर संजय निरुपम यांनी या घटनेचं समर्थन करणारे ट्वीट केले होते. त्यानंतर हा वाद आणखी वाढत आहे.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा