मागील विधानसभा निवडणुकीप्रमाणेच (maharashtra vidhan sabha election 2024) वरळी (worli) मतदारसंघ यंदाही सर्वाधिक चर्चेत असलेल्या मतदारसंघांपैकी एक राहिला आहे. आमदार आदित्य ठाकरे यांना आव्हान देण्यासाठी शिवसेनेच्या शिंदे गटाकडून कोणाला उमेदवारी दिली जाणार याबाबत चर्चा सुरू आहे.
मात्र, एकनाथ शिंदे (eknath shinde) यांच्याकडे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी जाहीरपणे वरळी मतदारसंघासाठी स्थानिक आमदाराची मागणी केली आहे. सोमवारी विधानसभा अध्यक्ष दत्ता नरवणकर यांनीही वरळीत शक्तिप्रदर्शन केले होते.
वरळी विधानसभा मतदारसंघ हा आमदार (mla) आदित्य ठाकरे (aditya thackeray यांचा मतदारसंघ आहे. आदित्य ठाकरे यावेळी या मतदारसंघातून निवडणूक (elections) लढवणार आहेत. त्यामुळे त्यांच्या विरोधात शिवसेनेचा शिंदे गट आणि महायुती (mahayuti) प्रबळ उमेदवाराच्या शोधात आहे.
आदित्य ठाकरे यांच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार संदीप देशपांडे यांनी या मतदारसंघातील लोकांशी संवाद सुरू केला आहे.
माजी नगरसेवक दत्ता नरवणकर हे शिंदे यांच्या शिवसेनेतून निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत. शिवसेनेत फूट पडल्यानंतर नरवणकर शिंदे गटात गेले. सध्या ते विधानसभेचे प्रमुखपद सांभाळत आहेत. त्यांच्या नावाची चर्चा होत असतानाच गेल्या काही दिवसांपासून या मतदारसंघातून भाजपच्या शायना एनसीही (shaina nc) इच्छुक असल्याची चर्चा आहे.
तर दुसरीकडे बाहेरून मोठा उमेदवार आणला जाणार असल्याचीही जोरदार चर्चा आहे. त्यामुळे नरवणकर समर्थक अस्वस्थ झाले असून त्यांनी वरळीत स्थानिक उमेदवारांनाच संधी देण्याची मागणी केली.
हेही वाचा