Advertisement

रस्त्यावर सभा घेऊ द्या, मनसेचं निवडणूक आयुक्तांना पत्र

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे काय बोलणार? याची उत्सुकता लागलेल्या तमाम चाहत्यांची बुधवारी चांगलीच निराशा झाली. पुण्यातील सभा पावसात वाहून गेल्यावर कार्यकर्त्यांची मेहनतही वाया गेली.

रस्त्यावर सभा घेऊ द्या, मनसेचं निवडणूक आयुक्तांना पत्र
SHARES
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे काय बोलणार? याची उत्सुकता लागलेल्या तमाम चाहत्यांची बुधवारी चांगलीच निराशा झाली. पुण्यातील सभा पावसात वाहून गेल्यावर कार्यकर्त्यांची मेहनतही वाया गेली. पुण्यात पावसाचा धुमाकूळ सुरूच राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवल्याने रस्त्यावर सभा घेण्यास परवानगी मिळावी, अशी मागणी मनसेने निवडणूक आयोगाकडे केली आहे. 

काय आहे पत्रात?

मनसेने राज्य निवडणूक आयुक्तांना एक पत्र लिहिलं आहे. या पत्रात पाऊस लांबल्याने मैदानात चिखल होत आहे. त्यामुळं सभा घेण्यात अडचणी येत आहे. पाऊस थांबला तरी चिखलात श्रोत्यांसाठी आसनव्यवस्था करता येत नाही, असं मनसेनं या पत्रात म्हटलं आहे. त्यामुळे मैदानांऐवजी रस्त्यावर प्रचारसभा घेण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी केली आहे. 

कुठं होती सभा?

राज ठाकरे यांची पहिली प्रचारसभा पुण्यातील नातू बाग येथील मैदानात होणार होती. परंतु पावसाने मैदानात चिखल आणि पाणी साचलं. असं असूनही सभा रद्द होऊ नये यासाठी कार्यकर्त्यांनी लागलीच वाळू आणि माती टाकून मैदान सुकवण्याचा प्रयत्न केला. परंतु पुन्हा जोरदार पाऊस झाल्याने कार्यकर्त्यांची मेहनत वाया गेली.

उत्तराची प्रतीक्षा

हवामान खात्याच्या अंदाजानुसार, परतीचा पाऊस लांबण्याची शक्यता आहे. त्यामुळं मैदानांत आयोजित केलेल्या प्रचारसभा रद्द होण्याची भीती आहे. त्यामुळे  निवडणूक आयोगानं दखल घेऊन विशेष बाब म्हणून मुंबई, ठाणे, पुणे आणि नाशिक शहरांतील रस्त्यांवर जाहीर सभांसाठी परवानगी द्यावी. तसंच प्रचारसभांसाठी रस्ते उपलब्ध करून द्यावेत, अशी विनंती मनसेनं निवडणूक आयुक्तांकडे केली आहे. मनसेच्या या पत्रावर अद्याप निवडणूक आयोगाकडून कुठलंही उत्तर देण्यात आलेलं नाही. 



हेही वाचा-

'त्याने' पक्ष बदलताच राज ठाकरेंच्या फोटोच्या जागी आले...

राज ठाकरेंची पहिली प्रचारसभा रद्द, मनसैनिकांचं लक्ष आता पुढच्या सभेकडे



संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा