Advertisement

कोरोनाला रोखण्यासाठी मुंबई काँग्रेसची टास्क फोर्स मैदानात

अडचणीत सापडलेल्या कोरोना बाधित रुग्णांना सर्वतोपरी म्हणजे अगदी २४ तास मदत करण्यासाठी मुंबई काँग्रेसने जिल्हानिहाय सहा ‘टास्क फोर्स’ गठीत केल्या आहेत.

कोरोनाला रोखण्यासाठी मुंबई काँग्रेसची टास्क फोर्स मैदानात
SHARES

वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई काँग्रेसने जिल्हानिहाय ६ ‘टास्क फोर्स’ गठीत केल्या आहेत. अडचणीत सापडलेल्या कोरोना बाधित रुग्णांना सर्वतोपरी म्हणजे अगदी २४ तास मदत करण्यासाठी ‘टास्क फोर्स’ गठीत केल्या आहेत. कोरोनाचा वाढत्या प्रादुर्भावामुळं सरकारी, महापालिका, खासगी रुग्णालयं रुग्णांनी भरली आहेत. अनेक कोरोना बाधित रुग्णांना बेड, रक्त, रेमडेसिवीर इंजेक्शन यांची कमतरता भासत आहे. 

रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना मदतीसाठी संपर्क करता यावा याकरिता मुंबई काँग्रेस कार्यालयात एक नियंत्रण कक्ष सुरू करण्यात येत असून, नागरिकांनी ०२२ -२२६२१११४ या हेल्पलाईनवर संपर्क साधावा. या टास्क फोर्समार्फत गरजू कोरोना बाधित रुग्णांना रुग्णालयात बेड, आयसीयू बेड, रेमडेसिवीर इंजेक्शन, रक्त, प्लाझ्मा, ऑक्सिजन आणि अन्य स्वरूपाच्या वैद्यकीय सेवांबाबत सर्वतोपरी सहकार्य करण्यात येणार आहे.

मुंबईकर नागरिकांना वैद्यकीय सेवेच्या लाभापासून वंचित राहावे लागणार नाही त्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. या संदर्भातील माहिती, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी दिली आहे. मुंबईत रुग्णांना रक्ताचा तुटवडा भासत आहे. ही गंभीर बाब पाहता मुंबई काँग्रेसने १० मे पर्यंत रक्तदान शिबिरे ठिकठिकाणी आयोजित करून १० हजार रक्ताच्या बाटल्या जमा करण्याचा निर्धार व्यक्त केला असून आतापर्यंत दीड हजार रक्ताच्या बाटल्या जमा करून रुग्णालयाला दिल्या आहेत, अशी माहिती भाई जगताप यांनी दिली. रुग्णांना रुग्णालयात तातडीनं नेण्यासाठी मुंबईत जिल्हानिहाय सहा रुग्णवाहिका पुरविण्यात येणार आहेत. 

कोणाला रेमडेसिवीर इंजेक्शन, रक्ताची, प्लाझ्माची गरज भासल्यास त्यांना ते सहज उपलब्ध व्हावे आणि त्यांची परवड थांबवी, यासाठी हेल्पलाईन द्वारे नागरिकांना टास्क फोर्स मोलाची मदत करणार असल्याचा दावा भाई जगताप यांनी यावेळी केला. मुंबई काँग्रेसनं प्लाझ्माची आवश्यकता असलेल्या रुग्णांसाठी कोरोनावर मात केलेल्या २२ कोरोना योद्ध्यांची व्यवस्था केली असल्याचंही त्यांनी सांगितलं.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा